AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटचा देवही रामलल्लाचं दर्शन घेणार… आपल्या सचिनलाही आलं निमंत्रण

Sachin Tendulkar Invite Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटन मुहूर्ताच्या दिवसाला अवघे काही दिवस बाकी आहेत. अशातच क्रिकेटच्या देवाला राम मंदिराचं आमंत्रण दिलं गेलं आहे.

क्रिकेटचा देवही रामलल्लाचं दर्शन घेणार... आपल्या सचिनलाही आलं निमंत्रण
| Updated on: Jan 14, 2024 | 5:35 PM
Share

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाआधी देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंंदिराचं उद्घाटन पार पडणार आहे. देशभरातील विविध क्षेत्रांमधील दिग्गजांना निमंत्रण देण्यात येत आहे. अशातच क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकराही या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. ANI ने ट्विट (एक्स) करत माहिती दिली आहे.

विश्व हिंदू परिषदेने याआधी रोहित शर्मा विराट कोहली यांना आमंत्रण दिलं होतं. आता सचिन तेंडुलकर हा तिसरा क्रिकेटर ठरला आहे ज्याला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं गेलं आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला राजकीय नेते, खेळाडू आणि सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी, चित्रपट स्टार अमिताभ बच्चन, रतन टाटा यांसारख्या देशभरातील अनेक हाय प्रोफाईल नावांना आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा आणि विराट कोहलीचाही समावेश आहे.

दरम्यान,  22 जानेवारीला रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. देशातील मान्यवरांना पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. सोहळ्याच आमंत्रण दिलं नसल्याने राजकीय वर्तुळातून भाजपवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातीलही विरोधकांमधील प्रमुख नेत्यांना अद्याप आमंत्रण दिलं गेलं नाही.

ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.