Mumbai Indians IPL 2022: संधी मिळेल तेव्हा मिळेल, तो पर्यंत अर्जुन तेंडुलकरचा जेवण बनवतानाचा Viral फोटो बघा

अर्जुनला संधी या सीजनमध्ये मिळणार की, पुढच्या सीजनपर्यंत वाट पहावी लागणार, ते येणारा काळच ठरवेल. तो पर्यंत आपला अर्जुन मास्टरशेफ बनला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या सीजनमध्ये अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही.

Mumbai Indians IPL 2022: संधी मिळेल तेव्हा मिळेल, तो पर्यंत अर्जुन तेंडुलकरचा जेवण बनवतानाचा Viral फोटो बघा
Mumbai Indians Arjun Tendulkar Image Credit source: ipl/bcci
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:06 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) सीजन संपत आला आहे. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) आता फक्त काही सामने बाकी उरलेत. या दरम्यान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? हे एक कोडचं आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्याआधी अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी मिळणार, अशी चर्चा सुरु होते. पण प्रत्यक्षात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळत नाही. मुंबई इंडियन्सने अर्जुनच्या गोलंदाजीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यामुळे ही चर्चा सुरु झाली. अर्जुनला संधी या सीजनमध्ये मिळणार की, पुढच्या सीजनपर्यंत वाट पहावी लागणार, ते येणारा काळच ठरवेल. तो पर्यंत आपला अर्जुन मास्टरशेफ बनला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या सीजनमध्ये अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. मात्र या टीमचे खेळाडू हताश झालेले नाहीत. त्यांनी स्वत:ला आनंदी ठेवण्याचा मार्ग शोधलाय. आयपीएल डेब्युची वाट पाहणाऱ्या अर्जुनचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात तो कुकिंग करताना दिसतोय.

अर्जुनच्या डेब्यु बद्दल हेड कोच म्हणाले….

मुंबई इंडियन्सच्या धवल कुलकर्णीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ज्यात अर्जुन कुकिंग करताना दिसतोय. अर्जुन चिकन रोस्ट करतोय. धवलने व्हिडिओला मास्टरशेफ म्हणून कॅप्शन दिलं आहे. अर्जुन तेंडुलकरशिवाय बेबी एबीच्या नावाने प्रसिद्ध असलेला डेवाल्ड ब्रेविस सुद्धा कुकिंग करताना दिसतोय. अर्जुन तेंडुलकरला डेब्युची संधी मिळाली नाही. डेवाल्ड ब्रेविस काही सामने खेळलाय. मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने यांनी अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याबद्दल विधान केलं होतं. नक्कीच संधी मिळू शकते, असं जयवर्धने म्हणाले होते. पण प्लेइंग -11 टीम कॉम्बिनेशन, मॅच कंडीशनच्या आधारावर निश्चित होते.

फक्त दोन मॅच जिंकल्या

मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होते. बेस प्राइसपेक्षा 10 लाख रुपये जास्त मोजले होते. आयपीएलचा हा सीजन मुंबई इंडियन्ससाठी खूपच खराब ठरलाय. मुंबईने 11 पैकी 9 सामने गमावले असून फक्त दोन मॅच जिंकल्या आहेत. आता मुंबई इंडियन्सचे फक्त तीन सामने उरलेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.