संजू सॅमसनसाठी चाहत्यांच कायपण! मॅच दरम्यान नको ते दृश्य पहावं लागणार

BCCI च्या सिलेक्शन कमिटीने दोन दिवसांपूर्वी T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर केली. या टीममधील सर्वच खेळडूंची निवड चाहत्यांना पटलेली नाही.

संजू सॅमसनसाठी चाहत्यांच कायपण! मॅच दरम्यान नको ते दृश्य पहावं लागणार
Sanju-samson
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 11:25 AM

मुंबई: BCCI च्या सिलेक्शन कमिटीने दोन दिवसांपूर्वी T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर केली. या टीममधील सर्वच खेळडूंची निवड चाहत्यांना पटलेली नाही. कोणाला टीममध्ये मोहम्मद शमी हवा होता, तर कोणाला दीपक चाहर. टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये संजू सॅमसन हवा, अशी देखील अनेक चाहत्यांची इच्छा होती.

काय होणार?

बीसीसीआयच्या निर्णयावर हे चाहते इतके नाराज आहेत की, ते आता आपल्या आवडत्या खेळाडूसाठी प्रदर्शन करणार आहेत. टीम इंडियाच्या मॅच दरम्यान हे दृश्य पहायला मिळू शकतं.

ट्विटरवर काय ट्रेंड होता?

बीसीसीआयने टीम जाहीर केल्यानंतर अनेक फॅन्सनी सोशल मीडियावर संजू सॅमसनच समर्थन केलं. ट्विटरवर #SanjuSamsonforT20WC हा ट्रेंड होता. वेस्ट इंडिज विरुद्ध संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली. मात्र तरीही त्याला वर्ल्ड कप टीममध्ये संधी न मिळाल्याने फॅन्स नाराज आहेत.

चाहत्यांना काय पटलं नाही?

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि केएल राहुल खराब फॉर्ममध्ये आहेत. मात्र तरीही त्यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला. चाहत्यांना हीच गोष्ट पटलेली नाही. तिरुवनंतपुरममध्ये संजूचे चाहते प्रदर्शन करणार आहेत. 28 सप्टेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना होणार आहे.

प्रदर्शनाची पद्धत काय असेल?

आयएएनएसच्या वृत्तानुसार, या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये हे दृश्य पहायला मिळू शकतं. फॅन्स संजू सॅमसनच्या चेहऱ्याचे टी-शर्ट घालून येणार आहेत.

संजूची निवड का केली नाही?

संजूला टीममध्ये का निवडलं नाही? माजी सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्याचं कारणही सांगितलं. “संजूला टीममध्ये कोणाच्या जागी घ्यायच? हा प्रश्न आहे. दीपक हुड्डामध्ये गोलंदाजीमध्ये अतिरिक्त ऑप्शन मिळतो. तो संजू सॅमसनसारखी फलंदाजी सुद्धा करु शकतो”. टीम मॅनेजमेंटने आशिया कपमध्ये संजूची निवड केली नाही. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सुद्धा संजूची निवड केलेली नाही.

साखळीतच आव्हान संपलं होतं पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. भारताशिवाय अन्य देशांनी आपल्या टीम्स जाहीर केल्या आहेत. मागच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच साखळीतच आव्हान संपुष्टात आलं होतं.

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.