AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्या कारकि‍र्दीत यशापेक्षा…”, विक्रमी शतकानंतर संजू सॅमसनने मन केलं मोकळं

भारतीय संघातून आत बाहेर असलेल्या संजू सॅमसनला अखेर लय सापडली आहे. श्रीलंका दौऱ्यात पू्र्णपणे फेल गेलेल्या संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक ठोकलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकत फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं.

माझ्या कारकि‍र्दीत यशापेक्षा..., विक्रमी शतकानंतर संजू सॅमसनने मन केलं मोकळं
| Updated on: Nov 09, 2024 | 5:56 PM
Share

भारतीय संघ सध्या टी20 मालिकेसाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. पहिल्याच टी20 सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 61 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनने सर्वोत्तम खेळी केली. संजू सॅमसनने 47 चेंडूत शतक पूर्ण केलं. तसेच 50 चेंडूत 10 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 107 धावा केल्या. संजू सॅमसनचं आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील सलग दुसरं शतक आहे. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात 40 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यामुळे संजू सॅमसन भारताचा नाही आशिया खंडातील टी20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं करणारा फलंदाज ठरला आहे. या खेळीचं श्रेय संजू सॅमसनने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला दिलं. या दोघांनी प्रोत्साहान दिल्याचं त्याने सांगितलं.

संजू सॅमसन श्रीलंका दौऱ्यात फेल गेला होता. तेव्हा प्रशिक्षक आणि कर्णधाराचे खूप सारे कॉल आले होते. तसेच फिरकीचा सामना करण्यावर जोर देण्यास सांगितलं होतं, असं संजू सॅमसनने सांगितलं. ‘अपयशात संवाद खूप महत्त्वाचा असतो. एक खेळाडू आपल्या खराब वेळेत हरवू शकतो. श्रीलंका मालिकेनंतर मला गौतमभाई आणि सूर्याचे खूप सारे कॉल आले. त्यात त्याने सांगितलं की मला कोणत्या गोष्टींवर काम करायचं आहे ते. त्यांनी सांगितलं की, फिरकीला खेळता जरा अडचणीत येतो असं वाटते. त्यामुळे केरळमध्ये फिरकीपटूंना एकत्र कर आणि खडबडीत विकेटवर प्रॅक्टिस कर.’, असं संजू सॅमसनने सांगितलं.

संजू सॅमसनला टीम इंडियात असताना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याच्या खूपच कमी संधी मिळाल्या. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तर बेंचवर बसून राहिला. त्यानंतर थेट झिम्बाब्वे दौऱ्यात खेळला. मात्र श्रीलंका दौरा काही खास राहिला नाही. त्यामुळे टीम इंडियाबाहेर जाण्याची वेळ आली होती. मात्र बांग्लादेश मालिकेच्या शेवटच्या सामन्यात सूर गवसला. तसेच दक्षिण अफ्रिकेतही त्याने हा फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं.

संजू सॅमसन म्हणाला, ‘माझ्या कारकिर्दीत मला अनेक अपयशांना सामोरे जावे लागले आहे. जेव्हा तुम्हाला वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा तुमच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. याशिवाय सोशल मीडियावर लोकांची टीका, शिवीगाळ यांचा सामना करावा लागतो. त्या टप्प्यावर मलाही प्रश्न पडत होते, की मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य खेळाडू नाही. मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत असताना, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी का करू शकलो नाही, असे अनेक विचार माझ्या मनात आले. पण बऱ्याच वर्षांच्या अनुभवानंतर मला आता कळले की माझ्यात काय क्षमता आहे.’

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.