IND vs BAN : सारा तेंडुलकरची भारत बांगलादेश सामन्यासाठी हजेरी, ‘ते’ नातं जोडत सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश सामना पुण्यातील एमसीए मैदानात सुरु आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशला बऱ्यापैकी रोखलं आहे. दुसरीकडे, हा सामना पाहण्यासाठी सारा तेंडुलकर हीने हजेरी लावल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

IND vs BAN : सारा तेंडुलकरची भारत बांगलादेश सामन्यासाठी हजेरी, ते नातं जोडत सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
IND vs BAN : भारत बांगलादेश सामन्यात सारा तेंडुलकरकडे नजरा खिळल्या, सोशल मीडियावर रंगली 'त्या' नात्याची चर्चा
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 19, 2023 | 5:59 PM

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर भारत बांगलादेश सामना पाहण्यासाठी पुण्यात आली आहे.स्टेडियममध्ये कॅमेऱ्यामॅननं तिला स्पॉट करताच चर्चांना उधाण आलं आहे. कारण सारा हा सामना पाहण्यासाठी कोणत्या कारणासाठी आली असावी? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याबाबत अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असतात. पण या निव्वल चर्चा असल्याचं स्पष्ट झालं आहे. दोघांनी आपल्या नात्याबाबत कधीच काहीही सांगितलेलं नाही. पण सोशल मीडियावरील युजर्संना फक्त निमित्त हवं असतं. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात असंच काहीसं झालं आहे. कॅमेरामॅननं सारा तेंडुलकरला स्पॉट करताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

सारा तेंडुलकर हीचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा सचिन तेंडुलकरने शुभेच्छा देत इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. “वाढदिवसाच्या शुभेच्छा एकच आणि फक्त! हमारी आँखो का तारा, सारा”. त्यानंतर सारा तेंडुलकर भारत बांगलादेश सामना पाहण्यासाठी पुण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.

दुसरीकडे, शुबमन गिल याने झेल पकडताच सारा तेंडुलकरने जबरदस्त रिअॅक्शन दिली. तौहीद हृदय याचा सीमा रेषेवर झेल घेतला. हा झेल घेताच सारा तेंडुलकरने टाळ्या वाजवल्या.

बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान टीम इंडिया कसं पूर्ण करते याकडे लक्ष अशणार आहे. तसेच शुबमन गिल किती धावा करणार? असा प्रश्नही विचारला जात आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.