AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : केएल राहुल याने घेतला जबरदस्त झेल, संधी मिळाली नाही तर खेचून आणली Watch Video

World Cup 2023, IND vs BAN : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशनं चांगली सुरुवात करून दिली. विकेट टेकिंग वेगवान गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. पण टीम इंडियाने नंतर बऱ्यापैकी कमबॅक केलं.

IND vs BAN : केएल राहुल याने घेतला जबरदस्त झेल, संधी मिळाली नाही तर खेचून आणली Watch Video
IND vs BAN : सिराजला विकेट मिळणं खूपच कठीण होतं, पण केएल राहुलने करून दाखवलं Watch Video Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 19, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 17व्या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने उभे ठाकले आहेत. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या तान्झिद हसन आणि लिटनदास यांनी संघाला सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विकेटसाठी चांगलंच झुंजवलं. कुलदीप यादव याने पहिला ब्रेक मिळवून दिला आणि टीम इंडिया ट्रॅकवर आली. रवींद्र जडेजा याने नजमुल शांतो याला तंबूत पाठवून सामन्यावर पकड मिळवली. पण हार्दिक पांड्या जखमी झाल्याने एक गोलंदाज शॉर्ट दिसून येत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा याच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे महागडे ठरलेल्या सिराजला पुन्हा चेंडू सोपवण्याशिवाय पर्याय नव्हता.

मोहम्मद सिराज याची पहिली चार षटकं खूप महाग पडली. 4 षटका 24 धावा देत एकही गडी बाद केला नाही. पण हार्दिक पांड्या जखमी झाल्याने रोहित शर्माकडे पर्यायही उरला नव्हता. 23 वं षटक मोहम्मद सिराजकडे सोपवलं पण त्यातही काही खास करू शकला नाही. 4 धावा देत स्कोअर कमी करण्यात यशस्वी ठरला. सिराजची विकेटसाठी धडपड पुढच्या षटकात केएल राहुलने पूर्ण केली.

25 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लेग साईडला उडी घेत अप्रतिम झेल घेतला. यामुळे मोहम्मद सिराजसह टीम इंडियाला दिलासा मिळाला. इतका कठीण झेल घेतल्याने सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. केएल राहुलने मागच्या काही महिन्यात विकेटकीपिंगवर घेतलेली मेहनत यातून अधोरेखित होत आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?