IND vs BAN : बांगलादेश विरुद्ध खेळताना टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा झटका, हार्दिक पांड्यासोबत नेमकं काय झालं?
World Cup 2023, IND vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 17 वा सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत बांगलादेशनं फलंदाजी स्वीकारली. निर्णयानंतर बांगलादेश चांगल्या स्थितीत असून टीम इंडियाला फटका बसला आहे.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियासमोर बांगलादेशचं मोठं आव्हान आहे. बांगलादेशनं यापूर्वी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे. त्यामुळे टीम इंडिया ताकही फुंकून पित आहे. स्पर्धेतील दोन मोठे उलटफेर पाहता तसंच काहीसं करावं लागणार आहे. बांगलोदशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तान्झिद हसन आणि लिट्टन दास यांनी बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. पण या सामन्यात भारताचं टेन्शन वाढणारी घटना नवव्या षटकात घडली. त्यामुळे भारतीय क्रीडा रसिकांची धाकधूक वाढली आहे. त्याला कारणंही तसंच आहे. हार्दिक पांड्या जखमी झाल्याने मैदान सोडून तंबूत परतला आहे.
वेगवान गोलंदाजांनी विकेट मिळत नसल्याचं पाहून कर्णधार रोहित शर्मा हैराण झाला होता. त्यामुळे त्याने नववं षटक हार्दिक पांड्याला सोपवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सावध फलंदाजी करणारे तान्झिद हसन आणि लिटन दास यांनी आक्रमक पवित्रा अवलंबला. लिटन दासने पहिला चेंडू खेळून काढला. पण नंतरच्या दोन चेंडूवर सलग चौकार मारले. तिसऱ्या चेंडूवर चौकार अडवताना नको तेच झालं.
हार्दिक पांड्याचा उजवा पाय मुरगळला आणि तो मैदानावरच पडला. त्यामुळे फिजिओ धावत मैदानात आले आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात सुधारणा दिसत नसल्याने त्याला तंबूत पाठवण्याचा निर्णय घेतला. तर उरलेले तीन चेंडू विराट कोहली याने पूर्ण केले.
Naseer Hussein:
Hardik Pandya won't be bowling or fielding for the rest of the innings.😲#INDvsBAN #HardikPandya pic.twitter.com/7WJWrj7Pvw
— 12th Khiladi (@12th_khiladi) October 19, 2023
Hope he's alright man 🙏🙏🙏Whole India is praying for you Hardik Pandya.He's our only hope in knockouts..#indiavsbangladesh #INDvsBAN #WorldCup2023 pic.twitter.com/gQWUXo8AKU
— Kung Fu Pandya (@King_Fu_Pandya_) October 19, 2023
Virat Kohli the bowler!!!!!!#ViratKohli #HardikPandya #INDvsBAN #ICCCricketWorldCup23 pic.twitter.com/i5JwTEaMHr
— Avinav Nandi 🇮🇳 (@nandi_avinav_) October 19, 2023
हार्दिक पांड्या जखमी झाल्याने आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. पाकिस्तान विरुद्धचा टोटका बांगलादेशच्या जादूपुढे फिका पडल्याची चर्चा रंगली आहे. आता या बाबत मजेशीर चर्चा रंगली आहे.
It looks like that Hardik will miss atleast next 4-5 matches. Huge blow for INDIA. Rohit will have to include Muhammad Shami in place of Hardik because Shardul is not a 10 overs bowler.#Hardik #ViratKohli #INDvsBAN #indiavsbangladesh #Bangladesh pic.twitter.com/RUnPu957TI
— Ahmad Javed (@ahmadjaved_1) October 19, 2023
After playing 2 matches continuously…
Hardik Pandya :#INDvsBAN pic.twitter.com/BuJYlOMBSM
— UmdarTamker (@UmdarTamker) October 19, 2023
दोन्ही संघांचे खेळाडू
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
