AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर मोहम्मद रिझवान याने केली पोलखोल, पाकिस्तानच्या चुकांचा पाढा वाचला

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघ बॅकफूटला आला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच स्तरावर पाकिस्तानी संघ अपयशी ठरला. मोहम्मद रिझवान याने याबाबत खुलासा केला आहे.

Video : भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर मोहम्मद रिझवान याने केली पोलखोल, पाकिस्तानच्या चुकांचा पाढा वाचला
Video : मोहम्मद रिझवान याने सांगितलं नेमक्या कुठे चुकलं? भारताकडून मिळालेल्या पराभवनानंतर जाहीर कबुली
| Updated on: Oct 19, 2023 | 2:41 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. या स्पर्धेत दोन मोठे उलटफेरही पाहायला मिळाले आहेत. तर भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला पराभूत करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना भारताने एकहाती जिंकला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच पातळीवर पाकिस्तानचा संघ कमकुवत ठरला. त्यामुळे पाकिस्तान संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.इतकंच काय तर बाबर आझम याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणीही होत आहे. वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी दावेदार असलेल्या संघासोबत नेमकं असं काय झालं? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबाबत आता मोहम्मद रिझवान खुलासा केला आहे. नेमक्या कुठे चुका झाल्या याबाबत सांगितलं आहे.

मोहम्मद रिझवान याने पाकिस्तानच्या नेमक्या काय चुका झाल्या याबाब पीसीबीवरील व्हिडीओत सांगितलं. ‘पाकिस्तानला परिस्थितीवर आधारित खेळणं गरजेचं आहे. तसेच क्षेत्ररक्षणावर काम करणं गरजेचं आहे.’ पाकिस्तान संघाला फिल्डिंगमध्ये सर्वात खराब गुणांकन मिळालं आहे. क्षेत्ररक्षण असो की झेल पकडणं, या दोन्ही ठिकाणी पाकिस्तानची सुमार कामगिरी राहिली आहे.

मोहम्मद रिझवानने सांगितलं की, ‘फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरले. पण ते गोलंदाजी योग्य पद्धतीने करत आहे.’ फिरकीपटूंवर खापर फोडताना ओपनिंग बॉलिंग आणि पॉवरप्लेमधील गोलंदाजीबाबत सांगण्यास विसरला. फलंदाजीत इमाम उल हक आणि फखर जमां फेल ठरले आहे. अब्दुल्ला शफीकने शतक ठोकलं खरं पण सातत्य राखण्याचं मोठं आव्हान आहे.

शाहीन शाह आफ्रिदी या स्पर्धेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पाकिस्तानचा स्ट्राईक गोलंदाज शाहीन आफ्रिदी सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे हारिस रऊफ याची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. हसन अली चांगली कामगिरी करत आहे. पण शाहीनच्या खराब फॉर्मचा पाकिस्तानला फटका बसत आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी असून या सामन्यातील निकाल पुढची वाट ठरवणार आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असून उपांत्य फेरीसाठी अजून 4 सामने जिंकणं आवश्यक आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.