SAW vs INDW, 5th T20I : टीम इंडियाचा फायनलमध्ये 23 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1 ने मालिका विजय

South Africa vs India Women 5th T20i Match Result : दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने टीम इंडियासमोर 155 धावांचा यशस्वी बचाव करत विजयी चौकार लगावला आहे. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे मायदेशातील मालिका 4-1 ने जिंकली.

SAW vs INDW, 5th T20I : टीम इंडियाचा फायनलमध्ये 23 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1 ने मालिका विजय
Laura Wolvaardt and Harmanpreet Kaur
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 27, 2026 | 10:59 PM

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i मालिकेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली आहे. दक्षिण आफ्रिका वुमन्सने या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी हॅट्रिक करुन मालिका आधीच आपल्या नावावर केली होती. त्यानंतर भारतीय महिला संघाने चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन विजयाचं खातं उघडलं होतं. त्यामुळे टीम इंडियाची महिला ब्रिगेड उर्वरित 1 सामना जिंकून सन्मानाने या दौऱ्याचा आणि मालिकेचा शेवट करणार का? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. महिला ब्रिगेडने यासह दक्षिण आफ्रिकेला सलग चौथा विजय मिळवण्यापासून रोखलं. चौथ्या सामन्यातील विजयामुळे भारतीय चाहत्यांच्या महिला ब्रिगेडकडून आशा वाढल्या होत्या. त्यामुळे पाचव्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. मात्र या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाच्या खेळाडूंनी निराशा केली.

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर या अंतिम सामन्यात 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 23 धावांआधी यशस्वीरित्या रोखलं. टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 132 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने अशप्रकारे 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 6 झटके देऊन 155 धावांवर यशस्वीरित्या रोखलं. दक्षिण आफ्रिकेसाठी कॅप्टन आणि ओपनर लॉरा वोल्वार्ड्ट हीने सर्वाधिक धावा केल्या. लॉराने 56 बॉलमध्ये 164.29 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 92 रन्स केल्या. लॉराने या खेळीत 2 षटकार आणि 11 चौकार लगावले. तसेच लॉरा व्यतिरिक्त सुने लुस हीने 100 च्या स्ट्राईक रेटने 23 धावा केल्या. तर इतरांना काही करण्याआधीच भारतीय गोलंदाजांनी रोखलं. टीम इंडियासाठी रेणुका ठाकुर, श्री चरणी आणि दीप्ती शर्मा या तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

भारतीय फलंदाजांकडून निराशा

दक्षिण आफ्रिकेकडून 156 धावांचं आव्हान मिळाल्याने टीम इंडिया जिंकेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र भारतीय महिला फलंदाजांनी निराशा केली. शफाली वर्मा 4 आणि जेमीमाह रॉड्रिग्स हीने 1 धाव केली. अनुष्का शर्माने 17 धावा जोडल्या. मिडल ऑर्डरमध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि भारती फुलमाळी या दोघींनी घट्ट पाय रोवले. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र दोघी ठराविक अंतराने आऊट झाल्या.

हरमनप्रीतने 22 धावा जोडल्या. तर अमरावतीकर भारती फुलमाळी हीने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यांनतर ऑलराउंडर दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष या जोडीकडून प्रचंड आशा होत्या. मात्र ऋचाला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. दीप्तीने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. अरुंधती रेड्डी 1 रनवर आऊट झाली. क्रांती गौड हीला भोपळाही फोडता आला नाही. तर ऋचा नाबाद परतली. ऋचाने 15 बॉलमध्ये नॉटआऊट 25 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी नाडीन डी क्लर्क आणि नॉनकुलुलेको म्लाबा या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. दक्षिण आफ्रिकेने यासह मालिका 4-1 ने आपल्या नावावर केली.

Follow Us