गौतम गंभीरनंतर आता गोलंदाजी प्रशिक्षकासाठी डावखुऱ्या गोलंदाजाचं नाव आघाडीवर!

टीम इंडियाच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. प्रशिक्षकपदाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर असून नवं पर्व सुरु झालं आहे. साडे तीन वर्षांच्या कालावधीत टीम इंडियाला उंचीवर नेण्याचं ध्येय गौतम गंभीरचं असणार आहे. असं असताना गौतम गंभीरच्या मदतीला कोचिंग स्टाफमध्ये कोण कोण असणार याची चर्चा रंगली आहे. आता दिग्गज खेळाडूचं नाव चर्चेत असेल.

गौतम गंभीरनंतर आता गोलंदाजी प्रशिक्षकासाठी डावखुऱ्या गोलंदाजाचं नाव आघाडीवर!
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 8:34 PM

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कात टाकण्यास सुरुवात केली आहे. टी20 फॉर्मेटमधून दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या जागेसाठी बरीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडनंतर प्रशिक्षकपदाची धुरा गौतम गंभीरने आपल्या हाती घेतली आहे. त्यामुळे साडेतीन वर्षांच्या कालावधीत बऱ्यात अपेक्षा असणार आहेत. असं असताना गौतम गंभीरच्या मदतीला कोचिंग स्टाफमध्ये कोण असेल याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. खासकरून बॉलिंग कोच म्हणून कोणाची नियुक्ती होणार याबाबब चर्चा रंगली आहे. या चर्चेत माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि लक्ष्मीपती बालाजी यांचं नाव चर्चेत आहे, अशी माहिती एएनआयने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. झहीर खान आणि लक्ष्मीपती बालाजी यांचं नाव या पदासाठी शर्यतीत आहे. या दोघांपैकी एक जण पारस म्हांब्रे याची जागा घेईल.

“बीसीसीआयने झहीर खान आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्याशी गोलंदाजी प्रशिक्षपदासाठी चर्चा केली आहे.बीसीसीआयला विनय कुमारच्या नावात तितका रस नाही.”, असं सूत्रांनी एएनआयला सांगितलं. जहीर खान हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीतील 92 कसोटीत 311 विकेट घेतल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये 610 विकेट्स घेतल्या आहेत. तर बालाजी 8 कसोटी सामने खेळला आहे. त्याने 37.18 च्या सरासरीने 27 विकेट्स घेतल्या आहेत. तर 30 वनडे सामन्यात त्याने 34 विकेट्स घेतल्या आहेत.

झहीर खान 2011 वनडे वर्ल्डकप संघात गौतम गंभीरसोबत होता. त्याच्या भेदक गोलंदाजीची गौतम गंभीरने अनेकदा स्तुती केली होती. विजयात त्याचा मोलाचा वाटा असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गौतम गंभीरसोबत कोचिंग स्टाफमध्ये कोण कोण असेल याची उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे, फिल्डिंग कोचसाठी जॉन्टी ऱ्होड्सचं नाव चर्चेत आहे. मात्र मागच्या काही वर्षात बीसीसीआयने देशांतर्गत कोचिंगला यासाठी प्राधान्य दिलं आहे. या सर्व पदांची भरती श्रीलंका दौऱ्यापूर्वी होणार आहे. भारतीय संघ 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.