AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: शाहीन आफ्रिदीची लाईव्ह सामन्यात लाज काढली, पंचांनी चेंडू हिसकावला आणि घातली बंदी

Big Bash League: बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेतील पदार्पणाचा सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला फटका बसला. त्याने 16 चेंडूत 43 धावा दिल्या. तसेच त्याला षटक सुरू असताना गोलंदाजीतून दूर केलं गेलं.

Video: शाहीन आफ्रिदीची लाईव्ह सामन्यात लाज काढली, पंचांनी चेंडू हिसकावला आणि घातली बंदी
BBL 2025-26: शाहीन आफ्रिदीची लाईव्ह सामन्यात लाज काढली, पंचांनी चेंडू हिसकावला आणि घातली बंदीImage Credit source: Daniel Pockett/Getty Images
| Updated on: Dec 15, 2025 | 5:26 PM
Share

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यातच पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीमुळे संघाला फटका बसला. दुसरा सामना ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात जीलॉन्गमध्ये हा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ब्रिस्बेन हीटसाठी पहिला बीबीएल सामना खेळला. पण त्याच्यासाठी हा सामना काही खास ठरला नाही. मेलबर्न रेनेगेड्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 212 धावा केल्या. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने सुमार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. हा सामना शाहीनसाठी वाईट स्वप्नासारखा होता. त्याने 2.4 षटकं टाकली आणि 43 धावा दिल्या. तसेच विकेटही मिळाली नाही. त्याचा इकोनॉमी रेट हा 16 पेक्षा वर होता. इतकंच काय तर त्याच्या हातून पंचांनी चेंडूही हिसकावून घेतला.

बिग बॅश लीगच्या पहिल्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीने 9 धावा दिल्या. त्यानंतर दुसरं षटकही महागडं ठरलं. त्यात त्याने 19 धावा दिल्या. तिसऱ्या षटकात तर त्याने फक्त 4 चेंडूत 15 धावा दिल्या. इतकंच काय तर पंचांनी त्याला षटक पूर्णही करून दिलं नाही. यात त्याने तीन नो बॉल टाकले होते. या नो बॉलपैकी दोन हाय फुल टॉस होते. त्यामुळे पंचांनी त्याला षटक टाकण्यापासून रोखलं. क्रिकेटच्या नियमानुसार, एका षटकात दोन घातक हाय फुल टॉस (बीमर) टाकल्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजी करू दिली जात नाही. त्यामुळे शाहीनला गोलंदाजीपासून रोखलं गेलं.

मोहम्मद रिझवानही फ्लॉप

मोहम्मद रिझवान देखील या बिग बॅश लीग स्पर्धेत काही खास करू शकला नाही. मोहम्मद रिझवानने मेलबर्न रेनेगेड्सच्या संघासाठी मैदानात उतरला. त्याने 10 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 4 धावा केल्या. पण असं असूनही त्याच्या संघाने मात्र चांगली खेळी केली. मेलबर्न रेनेगेड्सने 20 षटकात 5 गडी गमवून 212 धावा केल्या. यात टीम सीफर्टने 102 धावांची शतकी खेळी केली. दरम्यान, विजयी धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटचा संघ षटकात 198 धावा करू शकला. हा सामना मेलबर्न रेनेगेड्सने 14 धावांनी जिंकला.

राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.