
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यातच पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीमुळे संघाला फटका बसला. दुसरा सामना ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात जीलॉन्गमध्ये हा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ब्रिस्बेन हीटसाठी पहिला बीबीएल सामना खेळला. पण त्याच्यासाठी हा सामना काही खास ठरला नाही. मेलबर्न रेनेगेड्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 212 धावा केल्या. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने सुमार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. हा सामना शाहीनसाठी वाईट स्वप्नासारखा होता. त्याने 2.4 षटकं टाकली आणि 43 धावा दिल्या. तसेच विकेटही मिळाली नाही. त्याचा इकोनॉमी रेट हा 16 पेक्षा वर होता. इतकंच काय तर त्याच्या हातून पंचांनी चेंडूही हिसकावून घेतला.
बिग बॅश लीगच्या पहिल्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीने 9 धावा दिल्या. त्यानंतर दुसरं षटकही महागडं ठरलं. त्यात त्याने 19 धावा दिल्या. तिसऱ्या षटकात तर त्याने फक्त 4 चेंडूत 15 धावा दिल्या. इतकंच काय तर पंचांनी त्याला षटक पूर्णही करून दिलं नाही. यात त्याने तीन नो बॉल टाकले होते. या नो बॉलपैकी दोन हाय फुल टॉस होते. त्यामुळे पंचांनी त्याला षटक टाकण्यापासून रोखलं. क्रिकेटच्या नियमानुसार, एका षटकात दोन घातक हाय फुल टॉस (बीमर) टाकल्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजी करू दिली जात नाही. त्यामुळे शाहीनला गोलंदाजीपासून रोखलं गेलं.
Wow.
On his BBL debut, Shaheen Afridi has been removed from the attack! #BBL15 pic.twitter.com/IhDLsKFfJi
— KFC Big Bash League (@BBL) December 15, 2025
मोहम्मद रिझवान देखील या बिग बॅश लीग स्पर्धेत काही खास करू शकला नाही. मोहम्मद रिझवानने मेलबर्न रेनेगेड्सच्या संघासाठी मैदानात उतरला. त्याने 10 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 4 धावा केल्या. पण असं असूनही त्याच्या संघाने मात्र चांगली खेळी केली. मेलबर्न रेनेगेड्सने 20 षटकात 5 गडी गमवून 212 धावा केल्या. यात टीम सीफर्टने 102 धावांची शतकी खेळी केली. दरम्यान, विजयी धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटचा संघ षटकात 198 धावा करू शकला. हा सामना मेलबर्न रेनेगेड्सने 14 धावांनी जिंकला.