AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardul Thakur Reception | टीम इंडियाचा क्रिकेट शार्दुल ठाकूर याच्या लग्नसमारंभात राडा

टीम इंडियाचा खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या लग्नसमारंभात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Shardul Thakur Reception | टीम इंडियाचा क्रिकेट शार्दुल ठाकूर याच्या लग्नसमारंभात राडा
| Updated on: Mar 02, 2023 | 12:16 AM
Share

पालघर | टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाला. शार्दुल ठाकूर याने त्याची लहानपणाची मैत्रीण मिताली पारुळकरसोबत सप्तपदी घेतल्या. मोजक्या जणांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. त्यामुळे सर्वांनाच इच्छा असूनही लग्नाला उपस्थित राहता आलं नाही.  त्यामुळे शार्दुल आणि मिताली या दोघांनी पालघरमध्ये रिसेपशनचं आयोजन केलं. शार्दुलच्या या लग्नसमारंभाला गाळबोट लागल्याचं समोर आलं आहे. या रिसेपशनमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की काय झालं?

भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि भरत राजपूत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला आहे. भरत राजपूत हे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत. शार्दुल ठाकूरच्या लग्नसमारंभात हा राडा झाला. मात्र या राड्यानंतर मध्यस्थीनंतर कार्यकर्ते शांत झाले.  त्यामुळे पुढील वाद टळला.  मात्र या दोन्ही गटांमध्ये राडा होण्याचं कारण समजू शकलेलं नाही.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

शार्दुल ठाकूर याच्या रिसेपशनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शार्दुल आणि मिताली या दोघांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेस आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार मनीषा चोधरी यांची ही उपस्थिती होती.

दरम्यान शार्दुलचा  हळदी समारंभ शुक्रवारी 24 मार्चला पार पडला. शार्दुलचा या हळदी समारंभातील डान्सचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. शार्दुलने झिंगाट डान्सवर बुंगाट डान्स केला होता. त्यानंतर रविवारी 26 फेब्रुवारीला संगीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शार्दुलने मितालीसह रोमॅन्टिक डान्सही केला.

शार्दुल-मिताली यांचा साखरपुडा हा 29 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला होता. त्यानंतर टी 20 वर्ल्ड 2022 कपआधी हे दोघे गोव्यात लग्न करणार होते. मात्र काही कारणांमुळे गोव्यात लग्न होणं शक्य झालं नाही. तसेच लग्नही पुढं ढकलावं लागलं होतं. मात्र अखेर 15 महिन्यांच्या अंतरानंतर विवाह पार पडला.

कोण आहे मिताली पारुळकर?

मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल आणि मिताली हे दोघेही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत होते. अखेर या अनेक वर्षांच्या पार्टनरशीपनंतर दोघेही लाईफ पार्टनर झाले आहेत.

शार्दुलच्या बायकोच्या कंपनीच नाव काय?

फेब्रुवारी 2020 मध्ये मिताली पारुळकर स्वत:ची बेकरी कंपनी सुरु केली. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ तिच्या कंपनीचे नाव आहे. ती बिझनेसवुमन असून फेब्रुवारी 2020 पासून व्यवसाय संभाळतेय. या कंपनीची स्वत:ची वेबसाइट आहे. ‘ऑल द जॅझ-लक्झरी बेकर्स’ कंपनीकडून वेगवेगळे केक, कुकी, ब्रेड, बनस बनवले जातात. हा ब्रांड यशस्वी ठरला आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच