AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंडला घेऊन क्रिकेटपटू घुसला होता रुममध्ये, रोहित शर्माची तक्रार आणि….

भारतीय क्रिकेट आणि त्या संदर्भातील अनेक किस्से चर्चेत आहेत. आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने आपल्या आत्मचरित्रात अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विदेशी गर्लफ्रेंडला हॉटेलच्या रुममध्ये घेऊन गेल्याचा किस्सा शेअर केला आहे. तेव्हा नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात

गर्लफ्रेंडला घेऊन क्रिकेटपटू घुसला होता रुममध्ये, रोहित शर्माची तक्रार आणि....
विदेशी गर्लफ्रेंडला घेऊन भारतीय क्रिकेटपटू घुसला होता रुममध्ये, रोहित शर्माची तक्रार आणि....Image Credit source: Mike Hewitt/Getty Images
| Updated on: Jun 27, 2025 | 2:57 PM
Share

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात अनेक स्थित्यंत्तर झाली. क्रिकेटचं रुपडं पालटलं आणि बरंच काही घडलं. त्यामुळे क्रिकेटविश्वातील चर्चा कायम रंगत असतात. भारतीय क्रीडारसिकांना क्रिकेट आणि त्यातील किस्से कायम चर्चेचा विषय ठरला आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने आपल्या आत्मचरित्रात अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. शिखर धवनने ‘द वन: क्रिकेट, माय लाइफ अँड मोर’ या आत्मचरित्रात त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मजेदार किस्सा शेअर केला आहे. 2006 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला होता. या दौऱ्यात शिखर धवन इंडिया ए संघासोबत होता आणि एका मुलीच्या प्रेमात पडला होता. शिखर धवन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना डार्विनला पोहोचला आणि इमिग्रेशनच्या लाईनमध्ये त्याची नजर एका मुलीवर पडली. लगेज घेताना या दोघांमध्ये चर्चा रंगली आणि दोघांनी एकमेकांना नंबर आणि ईमेल आयडी शेअर केला.

शिखर धवन हॉटेलमध्ये पोहोचताच त्याने तिला ईमेल केला आणि तिनेही उत्तर दिलं. यानंतर शिखर धवनने तिला एका पार्टीत बोलवलं आणि ती त्यासाठी तयारही झाली. इतकंच काय तर शिखर धवनने तिला हॉटेलच्या रुममध्ये घेऊन जायचा. या रुममध्ये रोहित शर्मा त्याच्यासोबत शेअरिंगमध्ये राहात होता. शिखर धवनने लिहिलं की, ‘रोहित शर्मा ही बाब आवडत नव्हती. शिखरने हसतच सांगितलं की, रोहित कधी कधी हिंदीत तक्रार करायचा. तू मला झोपू देणार आहेस का?’ एक दिवस तिच्यासोबत हॉटेलच्या लॉबीमध्ये हातात हात घालून फिरत होता. तेव्हा एका वरिष्ठ निवडकर्त्याने मला पाहिलंय

शिखर धवनने सांगितलं की, ‘मी तिचा हात काही सोडला नाही, कारण मला वाटत होतं की मी काहीच चुकीचं करत नाही.’ यानंतर संपूर्ण संघात शिखरची ऑस्ट्रेलियात गर्लफ्रेंड असल्याची चर्चा पसरली. इतकंच काय तर या नात्यामुळे त्याचं क्रिकेटवरील लक्ष्य भरकटलं. त्याने पुढे लिहिलं की, ‘मी त्या दौऱ्यात चांगली कामगिरी केली असती तर मला वरिष्ठ भारतीय संघात जागा मिळाली असती. पण माझी कामगिरी खराब होत गेली.’

शिखर धवनने 2010 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं आणि वनडे खेळला. त्यानंतर 2013 मध्ये कसोटीत खेळला पण त्यात त्याला फार काही यश मिळालं नाही. त्याने भारतासाठी 34 कसोटी, 167 वनडे आणि 68 टी20 सामने खेळले. आयसीसी स्पर्धेत शिखर धवनची कामगिरी चांगली राहिली आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.