AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Life Update… सूर्यकुमार यादवचा रुग्णालयातील फोटो पाहून चिंता वाढली, नेमकं काय झालं ते जाणून घ्या

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचे रुग्णालयातील फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. भारत इंग्लंड कसोटी मालिका सुरु असताना सूर्यकुमार यादवला हॉस्पिटलच्या बेडवर पाहून क्रीडा चाहत्यांची चिंता वाढली. कारण बांग्लादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे.

Life Update... सूर्यकुमार यादवचा रुग्णालयातील फोटो पाहून चिंता वाढली, नेमकं काय झालं ते जाणून घ्या
सूर्यकुमार यादवचे रुग्णालयातील फोटो पाहून चिंता वाढली, नेमकं काय झालं ते जाणून घ्याImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 26, 2025 | 7:34 PM
Share

भारत इंग्लंड कसोटी मालिका सुरु असताना दुसऱ्या बाजूला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याच्यावर जर्मनीत शस्त्रक्रिया पार पडली. 34 वर्षीय सूर्यकुमार यादव भारतीय टी20 संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे. असं असताना ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यात टी20 सामने खेळणार आहे. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवला हॉस्पिटलच्या बेडवर पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. पण सूर्यकुमार यादववर जर्मनीत स्पोर्ट्स हर्नियावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. याबाबत सूर्यकुमार यादवने स्वत: माहिती दिली. सूर्यकुमार सांगितलं की, ‘लाइफ अपडेट, पोटाच्या खालच्या उजव्या भागात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, मी बरे होण्याच्या मार्गावर आहे हे कळवताना आनंद होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे.’

ऑगस्टमध्ये भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. पहिला टी20 सामना 26 ऑगस्ट आणि दुसरा टी20 सामना 31 ऑगस्टला होणार आहे. पण सूर्यकुमार यादव या दौऱ्यावर जाणार नाही असंच दिसत आहे. कारण स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर बरं होण्यासाठी सहा ते 12 आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे सूर्यकुमार यादव या मालिका मुकण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातटी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं आयोजने भारत आणि श्रीलंकेत केलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार असून भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.

शस्त्रक्रियेपूर्वी सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये शेवटचा खेळला होता. या स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 16 सामन्यात 717 धावा केल्या होत्या. यात पाच अर्धशतकांचा समावेश होता. सूर्यकुमार 2018 पासून मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. 2012 मध्ये केकेआरमधून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. चार वर्षे या फ्रेंचायझीसाठी खेळला आणि नंतर मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतलं. सूर्यकुमार यादवने 83 टी20 सामन्यात 2598 धावा केल्या आहेत. 37 वनडेत 773 धावा केल्या आहे. सूर्यकुमार यादव एकमेव कसोटी सामना खेळला असून त्यात त्याने फक्त 8 धावा केल्या आहेत.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.