शुबमन गिलचं टेन्शन वाढलं! जसप्रीत बुमराहबाबत घ्यावा लागणार मोठा निर्णय, तसं झालं तर…
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. यासह इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना दुसर्या सामन्यात कमबॅकचं आव्हान आहे. त्यात आता जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबत संशय आहे.

भारत आणि इंग्लंड या संघात दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियावर कमबॅकचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये बदल असेल यात काही शंका नाही. पण आता दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. कारण जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे फक्त तीन कसोटी सामन्यात खेळणार हे स्पष्ट आहे. त्यापैकी एक सामना जसप्रीत बुमराह खेळला आहे. त्यामुळे चार पैकी दोन सामन्यातच खेळेल. असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यातच जसप्रीत बुमराह नसेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिल याचं टेन्शन वाढणार आहे. कारण पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज व्यवस्थित कामगिरी बजावत होता. त्यामुळे त्याच्याशिवाय एजबेस्टनमध्ये उतरणं खूपच कठीण आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या होत्या.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बुमराह एजबेस्टनमध्ये होणआऱ्या दुसर्या कसोटी सामन्यात प्लेइंग 11 चा भाग नसेल. वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी त्याला आराम दिला जाईल. तर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल. हेडिंग्ले कसोटीत जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली होती. आता त्याची जागा भरून काढणं टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण त्याच्या इतका प्रभावी गोलंदाज टीम इंडियात नाही. त्यामुळे इंग्लंडला त्याच्या गैरहजेरीचा जबरदस्त फायदा होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत कमबॅक करण्याचं मोठं आव्हान कर्णधार शुबमन गिलच्या डोक्यावर आहे.
जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नाही तर प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळेल? असा प्रश्न आहे. संघ व्यवस्थापनाकडे अर्शदीप सिंग आणि आकाशदीप यांचा पर्याय असणार आहे. अर्शदीप सिंगने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. अर्शदीप सिंग इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळला आहे. यात त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. तर आकाशदीप 7 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 12 डावात एकूण 15 विकेट घेतल्या आहेत.
