AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : इंग्लंडला लोळवल्यानंतर शिवम-सूर्या या स्पर्धेत खेळणार, हार्दिकचाही समावेश, टीम जाहीर

Shivam Dube And Suryakumar Yadav : टीम इंडियाचा विस्फोटक ऑलराउंडर शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव दोघेही मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. जाणून घ्या.

Cricket : इंग्लंडला लोळवल्यानंतर शिवम-सूर्या या स्पर्धेत खेळणार, हार्दिकचाही समावेश, टीम जाहीर
suryakumar yadav and shivam dube
| Updated on: Feb 04, 2025 | 7:36 AM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडवर 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये मालिकेतील शेवटचा सामना जिंकला. टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे याने पुण्यात झालेल्या चौथ्या टी 20i सामन्यात विस्फोटक अर्धशतकी खेळी केली होती. तसेच शेवटच्या सामन्यातही शिवमने 30 धावांची सन्मानजनक खेळी केली. सूर्याला या मालिकेत बॅटिंगने काही खास करता आलं नाही. मात्र सूर्याने टीम इंडियाला कर्णधार म्हणून एकूण पाचवी टी 20i मालिका जिंकून दिली.

आता टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांचं मुंबई संघात पुन्हा एकदा कमबॅक झालं आहे. मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मेघालयला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबई क्वार्टर फायनलमध्ये हरयाणाविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समिताने संघ जाहीर केला आहे. या संघात सूर्या आणि शिवमचा समावेश करण्यात आला आहे. तसेच हार्दिक तामोरे, शार्दूल ठाकुर, आयुष म्हात्रे, अर्थव अंकोलेकेर यांचाही समावेश आहे.

शिवमला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेदरम्यान संधी मिळाली होती. त्यामुळे शिवमला मुंबई संघाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं होतं. मात्र आता टी 20i मालिकेनंतर शिवम आणि सूर्यकुमार दोघेही फ्री आहेत. या दोघांना इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोघे आता पुन्हा एकदा मुंबईकडून खेळताना दिसणार आहेत.

दरम्यान मुंबई विरुद्ध हरयाणा यांच्यातील क्वार्टर फायनल मॅच 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान चौधरी बंसी लाल क्रिकेट स्टेडियम, रोहतक येथे खेळवण्यात येणार आहे.

रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलसाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दूल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉस्टन डायास, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.