AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Akhtar: पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरच्या भारताला शिव्याशाप, म्हणाला….

Shoaib Akhtar: शोएब अख्तरने अखेर आपले खरे रंग दाखवले....

Shoaib Akhtar: पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरच्या भारताला शिव्याशाप, म्हणाला....
Shoaib-AktharImage Credit source: BCCI/Instagram
| Updated on: Oct 28, 2022 | 12:03 PM
Share

लाहोर: टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते आणि दिग्गज निराश झाले आहेत. झिम्बाब्वे सारख्या दुबळ्या टीमने पाकिस्तानवर 1 रन्सने विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग बिकट बनलाय. पाकिस्तानी चाहते आणि त्यांच्या माजी क्रिकेटपटूंना हा पराभव पचवणं कठीण जातय. त्यांच्यातोंडून आता भारतासाठी शिव्याशाप निघत आहेत.

पराभव शोएबच्या जिव्हारी लागला

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला झिम्बाब्वेकडून झालेला पराभव विशेष जिव्हारी लागलाय. या आठवड्यात पाकिस्तानची टीम मायदेशी परतत आहे. पुढच्या आठवड्यात भारतीय टीमची बॅग पॅक होईल, असं शोएबने म्हटलं आहे.

शोएबने रंग दाखवले

शोएब अख्तर क्रिकेट विश्वात रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जायचा. “पाकिस्तानने जी टीम निवडलीय, त्यावरुन ते पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर होतील” अशी शोएबने महिन्याभरापूर्वीच भविष्यवाणी केली होती. आता असं घडल्यानंतर भारतासोबतही असंच व्हाव, अशी शोएबची इच्छा आहे. भारतीय टीम फायनलपर्यंत पोहोचणार नाही, असं शोएब अख्तरने म्हटलय.

टीम इंडियाबद्दल शोएब अख्तरच्या तोंडून वाईट शब्द

पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरने यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेयर केलाय. त्याने पाकिस्तानी टीम मॅनेजमेंटवर आगपाखड केलीय. भारतावरही निशाणा साधला आहे. “पाकिस्तानची टीम या आठवड्यात मायदेशी परतेल. पुढच्या आठवड्यात भारत. सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन टीम इंडिया मायदेशी परतेल” असं शोएब अख्तरने म्हटलय.

पीसीबीला भरपूर सुनावलं

एकवेळ आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने पीसीबीला सुद्धा भरपूर सुनावलं आहे. सरासरी मॅनेजमेंट, सरासरी लोक आणि सरासरी विचार यामुळे हा निकाल दिसतोय. पीसीबीने ज्या दिवशी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा केली, त्याचदिवशी अख्तरने पाकिस्तान पहिल्या राऊंडमध्ये बाहेर होईल, अशी भविष्यवाणी केली होती. या मिडल ऑर्डरने तुम्ही काय करणार? मला तर भिती वाटते, पाकिस्तान पहिल्याच राऊंडमध्ये, तर बाहेर होणार नाही ना? असं शोएबने बोलून दाखवलं होतं.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप