India vs Pakistan, T20 World cup 2021: विराट नव्हे तर दुसऱ्याच भारतीय खेळाडूचा पाकिस्तानला मोठा धोका; शोएब अख्तरचा इशारा

| Updated on: Oct 22, 2021 | 8:14 PM

भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांतील नागरिकांचे लक्ष 24 ऑक्टोबर या तारखेकडे आहे. कारण याचदिवशी भारत आणि पाकिस्तान हे संघ आमने-सामने भिडणार आहेत.

India vs Pakistan, T20 World cup 2021: विराट नव्हे तर दुसऱ्याच भारतीय खेळाडूचा पाकिस्तानला मोठा धोका; शोएब अख्तरचा इशारा
शोएब अख्तर
Follow us on

T20 World Cup 2021 : भारत विरुद्ध पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन्ही संघाचा यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) हा पहिला सामना असणार आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेतील या भव्य सामन्याआधी दोन्ही देशातील माजी खेळाडू विविध विधानं करत आहेत. दरम्यान पाकिस्तान संघाचा स्टार माजी गोलंदाज आणि जगातील सर्वात वेगवान गोलंदाजीचा रेकॉर्ड नावावर असणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib akhtar) देखील त्याचं मत प्रदर्शन करत पाकिस्तान संघाला काही सल्ले दिले आहेत. यावेळी त्याने भारतीय संघात विराटपेक्षाही अधिक धोकादायक फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) असल्याचं विधान केलं आहे.

अख्तर याने झी न्यूजवर बोलताना सांगितलं की,“आजच्या काळात असा एकही पाकिस्तानी नाही जो म्हणेल भारतीय संघात चांगले खेळाडू नाही. सर्व पाकिस्तानी जनता हे मानते. विराट कोहलीला आम्ही महान फलंदाज मानतो. पण रोहितला त्याच्यापेक्षाही महान फलंदाज मानतो. तो भारतीय संघाचा इंजमाम उल हक आहे. तसंच ऋषभ पंतने  ऑस्ट्रेलियात जशी फलंदाजी केली तिही कौतुकास्पद आङे. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवचंपण कौतुक आहे.”

‘भारतातून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल भाग्यवान समजतो’

अख्तर कायम त्याच्या यूट्यूब चॅनलवरुन क्रिकेटबाबत विविध विधानं करत असतो. तो भारत आणि पाकिस्तान सामन्यांबद्दलही बरचं बोलतो. त्याचं म्हणनं आहे तो कायम निष्पक्षपणे वक्तव्य करतो आणि फॅन्सच्या मिळणाऱ्या प्रेमासाठी ते करणच योग्य आहे. तो म्हणाला, “मला अनेकदा मी पैसे कमवण्यासाठी चूकीची वक्तव्य करतो असे आरोप होतात. पण मूळात हे चूकीचं आहे. माझे भारतातही खूप फॅन्स आहेत. दोन्ही देशांतून मिळणाऱ्या प्रेमासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.”

आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान टी20

टी20 विश्वचषकाचं पहिलंच वर्ष असणाऱ्या 2007 साली ग्रुप मॅच दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बरोबरीत संपला. ज्यानंतर बॉल आऊटद्वारे निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर 2007 साली अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला नमवत ट्रॉफी जिंकली. त्यानंतर 2012 मध्ये सुपर 8 च्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. त्याचप्रमाणे 2014 मध्येही सुपर 10 मध्ये प्रथम खेळताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 3 गड्यांच्या बदल्यात 9 चेंडूं राखून हा सामना जिंकला. ज्यानंतर अखेरचा टी20 सामना 2016 मध्ये झाला ज्यात पावसामुळे सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला. त्यातही भारताने पाकिस्तानला  6 गडी राखून पराभूत केले.

हे ही वाचा-

India vs Pakistan, T20 World cup 2021: भारतीय संघासमोर कायम पाकिस्तानने गुडघे टेकले, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

पाकिस्तानला तर आपला विराट एकटाच पुरुन उरतो, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील आकडेवारी पाहाच!

(Shoaib akhtar name the indian batter who is More danger than virat kohli is Rohit sharma in Upcoming India vs Pakistan match)