
शोएब मलिकने अखेर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला पूर्णविराम लावला आहे. पुढच्या महिन्यात शोएब मलिक 44 वर्षांचा होणार आहे. तसेच पीएसएलचं 11वं पर्व असणार आहे. असं असताना शोएब मलिकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. शोएब मलिक 2016पासून पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत आहे. या दहा वर्षांच्या कारकिर्दीत चार संघाकडून खेळला आहे. कराची किंग्स आणि मुल्तान सुल्तांस या संघाचं कर्णधारपद भूषवलं. तर पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळला आहे. शोएब मलिक पहिल्या पर्वात कराची किंग्सचा कर्णधार होता. तेव्हा त्या संघाने सुमार कामगिरी केली होती. तेव्हा फक्त दोनच सामन्यात विजय मिळवला होता. त्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं आणि रवि बोपाराकडे सोपवलं. दुसऱ्या पर्वात अष्टपैलू म्हणून खेळला. त्यानंतर 2018 मध्ये मुल्तान सु्ल्तान्सचा कर्णधारपद भूषवलं. पण येथेही पदरी निराशा पडली. संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही.
पाकिस्तान सुपर लीग टी20 स्पर्धेत 2020 ते 2022 या कालावधीत पेशावर जाल्मीसाठी खेळला. तर 2023 मध्ये कराची किंग्समध्ये पुन्हा आला. 2025 मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी खेळला आणि आता निवृत्तीची घोषणा काली आहे. शोएब मलिकने या स्पर्धेत एकूण 92 सामने खेळले. तसेच 2318 धावा केल्या. या दरम्याने त्याने 15 अर्धशतकं ठोकली. तसेच त्याच्या नावावर 16 विकेट आहेत.
Shoaib Malik has announced his retirement from the Pakistan Super League as a player after completing 10 seasons. He stated that while his playing journey in PSL has ended, he will continue to contribute to cricket in the future. pic.twitter.com/hq0mnZXPx9
— انضمام سجاد (@I_Engr56) January 20, 2026
शोएब मलिक पाकिस्तान संघासाठी दीर्घकाळ खेळला. शोएब मलिकने नोव्हेंबर 2021 मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग नव्हता. शोएब मलिक 1999 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. या दरमन्यात 35 कसोटी, 287 वनडे आणि 124 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. जगभरातील वेगवेगळ्या लीग्समध्येही नशिब आजमावलं. त्याने एकूण 557 टी20 सामने खेळले. यात 35.99 च्या सरासरीने 13571 धावा केल्या. तसेच 83 टी20 शतक ठोकले. पण टी20 शतक ठोकू शकला नाही.