टी-20 विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, हा खेळाडू संघाबाहेर

टी-20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के बसत आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वी धक्क्यांवर धक्के, हा खेळाडू संघाबाहेर
टीम इंडियाImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 8:47 PM

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (INS vs SA) आज टी 20 (T20) सीरीजमधला शेवटचा सामना सुरु आहे. सामना सुरु होण्यापूर्वी पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मानं एक मोठी घोषणा केली आणि यामुळे टीम इंडियाची चिंता आणखी वाढली आहे. टी-20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वी पाठीच्या दुखण्यामुळे जसप्रीत बुमराह संघाबाहेर गेलाय. त्यात आता आणखी एका खेळाडूनं दगा दिली आहे.

हे ट्विट पाहा

अर्शदीप सिंग संघाबाहेर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं की, अर्शदीप सिंग पाठीच्या दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. या रोहित शर्माच्या माहितीमुळे आणखी टेन्शन वाढलं आहे.

रोहित म्हणाला की, अर्शदीपला त्याच्या पाठीत काही समस्या असल्यानं तो खेळू शकणार नाही. हा एक सावधगिरीचा उपाय आहे, काहीही गंभीर नाही, असंही रोहित म्हणालाय.

टीम इंडियाचे प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिकेचा खेळ-11

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.