AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Ayer : श्रेयस अय्यरने इतिहास रचला, कसोटी पदार्पणातचं शतक झळकावलं

श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे. कसोटी पदार्पणातचं श्रेयस अय्यरनं शतक झळकावलं आहे. त्यानं या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत.

Shreyas Ayer : श्रेयस अय्यरने इतिहास रचला, कसोटी पदार्पणातचं शतक झळकावलं
श्रेयस अय्यर
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 26, 2021 | 10:41 AM
Share

कानपूर: श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे. कसोटी पदार्पणातचं श्रेयस अय्यरनं शतक झळकावलं आहे. त्यानं या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. शतक झळकावत श्रेयस अय्यरनं कर्णधार अजिंक्य रहाणे याचा विश्वास सार्थ ठरवला आहे. श्रेयस अय्यर 105 धावाकरुन बाद झाला आहे. श्रेयस अय्यरच्या शतकाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर टीम इंडिया पहिल्या डावात किती धावा करणार याकडं देखील सर्वांचं लक्ष लागलंय.

श्रेयस अय्यरने ग्रीन पार्क स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिलं शतक झळकावत इतिहास रचला आहे. पदार्पणातचं शतक झळकावणारा तो भारताचा 16 वा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यरनं गेल्या दोन वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेलं नाही. मोठ्या कालावधीनंतर प्रथमचं रेड बॉलचा सामना करणाऱ्या अय्यर शतक झळकावत टीम इंडियाचा डावाला आधार दिला. त्यानं 157 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. कानपूरच्या मैदानावर पदार्पणात शतक झळकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. 1969 मध्ये गुंडाप्पा विश्वनाथ यांनी शतक झळकावलं होतं. विश्वनाथ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं.

न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणात शतक झळकणारा तिसरा भारतीय

न्यूझीलंड विरोधात पदार्पणात शतक झळकवणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. एजी कृपाल सिंह यांनी नोव्हेंबर 1955 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 100 धावा केल्या होत्या. ती मॅच हैदराबाद मध्ये झाली होती. तर, सुरिंदर अमरनाथ यांनी ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये जानेवारी 1976 मध्ये पदार्पणात शतक कोलं होतं. त्यानंतर तब्बल 45 वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडून न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणात शतक केलं आहे.

टीम इंडियाच्या 300 धावा पूर्ण, वृद्धिमान साहा आऊट

एकीकडे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या खेळीमुळं टीम इंडिया 300 धावापूर्ण झाल्या आहेत. तर, दुसरीकडे वृद्धिमान साहा 1 रन करुन आऊट झाला आहे.

इतर बातम्या:

Ind vs NZ, Live 1st Test, Day 2 Score : टीम इंडियाला मोठा धक्का, शतकवीर श्रेयस अय्यर आऊट

Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली