Ind vs NZ, Live 1st Test, Day 2 Score : न्यूझीलंडकडून धमाकेदार खेळ, 57 षटकांत 129 धावा

श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे. कसोटी पदार्पणातचं श्रेयस अय्यरनं शतक झळकावलं आहे. त्यानं या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत.

Ind vs NZ, Live 1st Test, Day 2 Score : न्यूझीलंडकडून धमाकेदार खेळ, 57 षटकांत 129 धावा
श्रेयस अय्यरचे शतक

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज दिवसभराचा खेल संपला आहे. भारताचा डाव संपला असून आता न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 129 धावा केल्या आहेत.  57 षटकांमध्ये न्यूझीलंडने हा धावफलक उभारलाय. तर याआधी पहिल्या कसोटीतील टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपला आहे. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल, रविंद्र जाडेजा यांनी पहिल्या डावात केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे. टीम इंडियाकडून  श्रेयस अय्यर 105,  शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा  50 आणि आर आश्विननं 38 धावा केल्या.

Match Highlights

 • शुभमन गिलनं डावाचा पाया रचला

  टीम इंडियाला शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली. शुभमन गिलनं 52 धावा केल्या. मयंक अग्रवाल आऊट झाल्यानंतर पुजाराच्या साथीनं त्यानं पहिल्या सत्रात टीम इंडियाच्या डावाचा पाया रचला.

 • चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा फेल

  चेतेश्वर पुजारा आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना दोघे पुन्हा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. दोघांनी चांगली सुरुवात करुन देखील त्याचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत त्यांना करता आलं नाही.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 26 Nov 2021 16:44 PM (IST)

  न्यूझीलंडकडून धमाकेदार खेळ, 57 षटकांत 129 धावा

  न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या डावात 129 धावा केल्या. 57 षटकांत न्यूझीलंडने ही किमया साधली. सध्या विल यंग आणि टॉम मैदानात असून विलने 75 धावा केल्या तर टॉमने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

 • 26 Nov 2021 16:12 PM (IST)

  न्यूझीलंडच्या 52 षटकात 122 धावा

  न्यूझिलंड विरुद्ध भारत या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा डाव आटोपला आहे. सध्या न्यूझीलंडने फलंदाचीच्या पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केलीय. एकही गडी न गमावता सध्या न्यूझिलंडने 122 धाव्या केल्या आहेत. न्यूझीलंडने 52 षटकांमध्ये ही धावसंख्या उभारली आहे. सध्या विल यंग आणि टॉम लॅथम मैदानात असून विलने 72 धावा केल्या आहेत. तर टॉम 46 धावांवर खेळतोय.

 • 26 Nov 2021 15:26 PM (IST)

  न्यूझीलंडच्या सलामीवीरांची शतकी भागिदारी

  न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना पहिल्या विकेटसाठी मेहनत करायला लावलीय. विल्यम यंगनं 64 धावा केल्या आहेत. तर, नॅथन टॉमनं 34 धावा केल्या असून न्यूझीलंडच्या 105 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांना कधी पहिलं यश मिळणार हे पाहावं लागणार आहे.

 • 26 Nov 2021 15:10 PM (IST)

  न्यूझीलंडच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात, विल्यम यंगचं अर्धशतक

  न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना पहिल्या विकेटसाठी मेहनत करायला लावलीय. विल्यम यंगनं 62 धावा केल्या आहेत. तर, नॅथन टॉमनं 28 धावा केल्या असून न्यूझीलंडच्या 93 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांना कधी पहिलं यश मिळणार हे पाहावं लागणार आहे.

 • 26 Nov 2021 13:56 PM (IST)

  न्यूझीलंडच्या ओपनर्सची 50 धावांची सलामीची भागिदारी

  न्यूझीलंडचे ओपनर्स टॉम लॅथन आणि विल्यम यंग यांनी 50 धावांची सलामीची भागिदारी केली आहे. टीम इंडियांच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यात यश आलेलं नाही.

 • 26 Nov 2021 12:34 PM (IST)

  न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात, टॉम लॅथन आणि विल यंग मैदानात

  टीम इंडियाचा पहिला डाव  345 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात झाली आहे.  टॉम लॅथन आणि विल यंग मैदानात उतरले आहेत.

 • 26 Nov 2021 12:32 PM (IST)

  टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपला

  पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपला आहे. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल, रविंद्र जाडेचा यांनी पहिल्या डावात केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे. टीम इंडियाकडून  श्रेयस अय्यर 105,  शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा  50 आणि आर आश्विननं 38 धावा केल्या.

 • 26 Nov 2021 12:17 PM (IST)

  टीम इंडियाला 9 वा धक्का, आश्विन 38 धावांवर बाद

  img

  दुसऱ्या सत्रात पहिल्या दिवसाप्रमाणं टीम इंडियाला 9 वा धक्का बसला आहे. पहिल्यासत्रात सेट झालेला आर. आश्विन 38 धावांवर बाद झाला आहे. एजाज पटेल यानं त्याला बोल्ड केलं.

   

 • 26 Nov 2021 12:00 PM (IST)

  पहिल्या सत्राचा खेळ संपला, टीम इंडियाच्या 339 धावा

  दुसऱ्या दिवशीचा पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. सध्या जेवणासाठी ब्रेक घेण्यात आला आहे. तर, टीम इंडियानं  339 धावा केल्या असून आतापर्यंत  8 विकेट गेल्या आहेत.

 • 26 Nov 2021 11:10 AM (IST)

  टीम इंडियाला आठवा धक्का, अक्षर पटेल 3 धावांवर बाद

  img

  टीम इंडियाला आठवा धक्का बसला असून अक्षर पटेल 3 धावांवर बाद झाला आहे. सध्या रविचंद्रन आश्विनने टीम इंडियाच्या बँटिंगची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. त्यानं  29 धावा केल्या आहेत.

 • 26 Nov 2021 10:39 AM (IST)

  टीम इंडियाला मोठा धक्का, शतकवीर श्रेयस अय्यर आऊट

  img

  श्रेयस अय्यरने ग्रीन पार्क स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिलं शतक झळकावत इतिहास रचला आहे. 105 धावा केल्यानंतर श्रेयस अय्यर आऊट झाल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

 • 26 Nov 2021 10:17 AM (IST)

  टीम इंडिया 300 धावांच्याजवळ, वृद्धिमान साहा आऊट

  img

  एकीकडे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या खेळीमुळं टीम इंडिया 300 धावांच्या जवळ पोहोचली आहे. तर, दुसरीकडे वृद्धिमान साहा 1 रन करुन आऊट झाला आहे.

 • 26 Nov 2021 10:06 AM (IST)

  श्रेयस अय्यरने इतिहास रचला, कसोटी पदार्पणातचं शतक झळकावलं

  श्रेयस अय्यरने इतिहास रचला आहे. कसोटी पदार्पणातचं श्रेयस अय्यरनं शतक झळकावलं आहे. त्यानं या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. शतक झळकावत श्रेयस अय्यरनं कर्णधार अजिंक्य रहाणे याचा विश्वास सार्थ ठरवला आहे. श्रेयस अय्यरच्या शतकाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर टीम इंडिया पहिल्या डावात किती धावा करणार याकडं देखील सर्वांचं लक्ष लागलंय.

 • 26 Nov 2021 09:55 AM (IST)

  वृद्धिमान साहा मैदानात, श्रेयस अय्यरला साथ देण्याचं आव्हान

  रवींद्र जाडेजा 50 धावांवर बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा विकेटकीपर वृद्धिमान साहा मैदानात आला आहे. पदार्पणात टीम इंडियाचा डाव सावरणाऱ्या श्रेयस अय्यरला साथ देण्याचं आव्हान साहा समोर असेल.

 • 26 Nov 2021 09:49 AM (IST)

  भारताला दुसऱ्या दिवशी मोठा धक्का, रवींद्र जाडेजा आऊट

  img

  भारताला दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जाडेजाला आऊट करण्यात न्यूझीलंडला यश आलं आहे. टीम साऊथीच्या गोलांदाजीवर जाडेजा आऊट  झाला. त्यानं 50 धावा केल्या.

 • 26 Nov 2021 09:46 AM (IST)

  श्रेयस अय्यरचा मिडविकेटला चौकार

  img

  श्रेयस अय्यरने काईल जेमिनसन याच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावला आहे. ओव्हरच्या पहिल्या बॉलवर त्यानं मिडविकेटला फोर मारला. श्रेयस अय्यरच्या शतकाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI