AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : श्रेयस अय्यरचा रॉकेट थ्रो, अचूक लक्ष्य आणि दणका…

श्रेयस अय्यरचा रॉकेट थ्रो आणि दक्षिण आफ्रिकेला मिळालेला दणका. एकदा व्हिडीओ पाहाच...

VIDEO : श्रेयस अय्यरचा रॉकेट थ्रो, अचूक लक्ष्य आणि दणका...
13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा धक्का बसलाImage Credit source: social
| Updated on: Oct 04, 2022 | 11:48 PM
Share

नवी दिल्ली : भारत (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसऱ्या टी-20 (T20) दरम्यान होळकर स्टेडियममध्ये डेकॉकचा खेळ अचूक थ्रोनं संपला तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले. धुमधडाक्यात फलंदाजी करणारा क्विंटन डी कॉक चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत होता.

सलग दुसरे अर्धशतक ठोकल्यानंतर क्विंटन डी कॉक टीम इंडियाला अधिक धोकादायक दिसत होता. पण, जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या श्रेयसनं रॉकेट फेकत दक्षिण आफ्रिकेच्या दणका दिला.

हा व्हिडीओ पाहा

विकेट कधी पडली?

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा धक्का बसला. 68 धावा खेळत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि सलामीवीर क्विंटन डी कॉकला दुसरी धाव घ्यायची होती. या प्रयत्नात तो बाहेर पडला. उमेश यादवचा वाईड यॉर्कर चेंडू बॅटच्या आतील काठावर आदळला.

पुढे फलंदाज दुसऱ्या धावांसाठी धावले. डिप मिडविकेटवर उभ्या असलेल्या श्रेयसनं चपळाईनं चेंडूकडे वळवला आणि नंतर एका शानदार थ्रोने चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे आणला. बाकीच्या कामात पंतने काहीही चूक केली नाही. डी कॉकने 43 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांसह 68 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने 227 धावा केल्या

नंतर, रिले रौसोने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीन विकेट्सवर 227 धावांवर नेली. रोसूने 48 चेंडूंत आठ षटकार आणि सात चौकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली.

ट्रिस्टन स्टब्स (23) आणि डेव्हिड मिलर यांनी अखेरच्या सामन्यात केवळ पाच चेंडूंत नाबाद 19 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शेवटच्या आठ षटकात 108 धावा केल्या.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...