IND vs ENG: दुसरा कसोटीनंतर शुबमन गिलचं कर्णधारपद गेलं असतं! का ते बुचरने सांगितलं

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात विजय मिळवताच त्याच्या कर्णधारपदाचं कौतुक होत आहे. पण दुसऱ्या सामन्यात पराभव झाला असता तर कर्णधारपद सोडावं लागलं असतं, असं भाकीत माजी क्रिकेटपटूने केलं आहे.

IND vs ENG: दुसरा कसोटीनंतर शुबमन गिलचं कर्णधारपद गेलं असतं! का ते बुचरने सांगितलं
'दुसरा कसोटी सामन्यानंतर शुबमन गिलला कर्णधारपदावरून काढलं असतं'
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 08, 2025 | 4:03 PM

शुबमन गिलकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व आल्यापासून कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात दीडशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला धावांचा डोंगर उभा करता आला आणि विजयश्री खेचून आणण्यास मदत झाली. असं असताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बुचर याने शुबमन गिलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शुबमन गिलने एक निर्णय घेतला असता तर एजबेस्टन कसोटी सामना त्याच्या कर्णधारपदाचा शेवट असता. मार्क बुचरने असं सांगितल्याने क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. मार्क बुचरने एजबेस्टन कसोटीत सांगितलं की, शुबमन गिल जर नाणेफेक जिंकला असता तर त्याने क्षेत्ररक्षण निवडलं असतं. मग हा त्याच्या कर्णधारपदाची शेवटचा सामना असता. कारण इंग्लंडची जी स्थिती झाली तीच स्थिती दुसऱ्या सामन्यात भारताचा होऊ शकली असती. त्यामुळे नाणेफेक गमावणे पथ्यावर पडलं.

लीड्स कसोटी गमावल्याने भारतावर दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅकचं मोठं आव्हान होतं. एजबेस्टनमध्ये भारताने यापूर्वी कधीच सामना जिंकला नव्हता. त्यामुळे भारतावरील दडपण वाढलं होतं. पण शुबमन गिलच्या फलंदाजी आणि नेतृत्वाने ही अशक्यप्राय गोष्ट सिद्ध करून दाखवली. बर्मिंघममध्ये नाणेफेक गमवल्यांतर प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने प्रथम फलंदाजी करत 587 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल 87 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यात रवींद्र जडेजाने 89 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार गिलने 269 धावांची खेळी करत सर्व विक्रम मोडीत काढले. इंग्लंडचा पहिला डाव 407 धावांवर आटोपला. यात मोहम्मद सिराजने 6, तर आकाश दीपने 4 विकेट घेतल्या.

भारताने दुसऱ्या डावात 180 धावांच्या आघाडीसह पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताने 427 केल्या आणि डाव घोषित केल्या. भारताने दुसऱ्यातील धावांसह 607 धावा केल्या आणि 608 धावांचं लक्ष्य ठेवलं. यात शुबमन गिलने 161 धावा केल्या. केएल राहुलने 55, तर ऋषभ पंतने 65 धाव केल्या. तर रवींद्र जडेजाने 69 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 271 धावांवर आटोपला. भारताने हा सामना 336 धावांनी जिंकला.