AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात गिल देणार असं उत्तर, दोनदा फेल गेल्यानंतर खास रणनिती

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिलची बॅट काही चालली नाही. दोन्ही डावात फेल गेला. असं असताना कोलंबो कसोटीत गिल नव्या रणनितीसह उतरणार आहे. यासाठी त्याने तयारी केली आहे.

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात गिल देणार असं उत्तर, दोनदा फेल गेल्यानंतर खास रणनिती
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात गिल देणार असं उत्तर, दोनदा फेल गेल्यानंतर खास रणनितीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 21, 2026 | 4:48 PM
Share

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 165 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दोन्ही डावात निराशा केली. पहिल्या डावात 16, तर दुसऱ्या डावात 8 धावा करून बाद झाला. दोन्ही वेळेस फिरकीपटू प्रभात जयसूर्याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आता कोलंबो कसोटी सामन्यासाठी शुबमन गिलने खास तयारी केली आहे. श्रीलंकन संघाला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी रणनिती आखली आहे. शुबमन गिलने कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये पाय ठेवताच फिरकीचा सामना केला. यावेळी त्याने टुकूटुकू नाही तर जोरदार प्रहार करत उत्तुंग षटकार मारले. त्याने फिरकीपटूंना आक्रमकपणे उत्तर देण्याचं ठरवल्याचं दिसत आहे.

शुबमन गिल सराव दरम्यान सकारात्मक दिसला. मागच्या दोन डावात काय झालं ते सोडून आता नव्या रणनितीसह सज्ज झाला आहे. गिलचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून हे स्पष्ट दिसत आहे. त्याने मानव सुथार, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध गिल फलंदाजीत कमकुवत असल्याचं दिसून आला आहे. डावखुऱ्या गोलंदाजांनी 42 कसोटी सामन्यांमध्ये त्याला 11 वेळा बाद केले आहे. त्यामुळे या सरावाचा नक्कीच त्याला फायदा होईल. शुबमन गिलने फिरकीचा आक्रमक सामना करण्याची रणनिती करण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्याचं उत्तर फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी दिलं आहे.

साईराज बहुतुले म्हणाले की, ‘गिलसोबत धावा कायम राहतात. परिस्थितीनुसार वागण्याचा त्याचा स्वभाव आहे. परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याने असा सराव केला.’ श्रीलंकेतील कोलंबोतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असते. त्यामुळे शुबमन गिलकडे मोठी खेळी करण्याची संधी आहे. शुबमन गिल काही अंशी विराट कोहलीसारखा आहे. विराट कोहलीही नव्या मैदानावर आला की आक्रमक फटकेबाजी करतो. त्यानंतर डिफेंस करतो. या रणनितीमुळे खेळपट्टीनुसार हँड आय यांचं कॉर्डिनेशन होतं.

Follow Us
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट