Shubhaman Gill IPL 2022: खूप हळू खेळलास म्हणून ट्रोल करणाऱ्यांना शुभमन गिलचं सडेतोड उत्तर

IPL 2022: शुभमन गिल सोशल मीडियावर ट्रोल झाला. ट्रोलर्सच्या मते गिल खूप धीम्यागतीने खेळला. या ट्रोलिंगला आता शुभमन गिलने उत्तर दिलं आहे.

Shubhaman Gill IPL 2022: खूप हळू खेळलास म्हणून ट्रोल करणाऱ्यांना शुभमन गिलचं सडेतोड उत्तर
शुभमन गिलची ऑरेंज कॅपमध्ये आगेकूचImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:49 PM

मुंबई: IPL 2022 च्या सीजनमध्ये प्लेऑफमध्ये दाखल होणारा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पहिला संघ ठरला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने मंगळवारी 9 वा विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सला त्यांनी तब्बल 62 धावांनी पराभूत केलं. शुभमन गिल (Shubhaman Gill) मॅचचा हिरो ठरला. त्याने महत्त्वाच्या प्रसंगात अर्धशतकी खेळी केली. त्याने 49 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. त्यामुळेच गुजरात टायटन्सचा संघ 144 धावांपर्यंत पोहोचला. शुभमन गिलची खेळी लक्षात घेऊनच त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. गिलचा स्ट्राइक रेट 128.57 होता. मॅच विनिंग खेळी खेळल्यानंतरही शुभमन गिल सोशल मीडियावर ट्रोल झाला. ट्रोलर्सच्या मते गिल खूप धीम्यागतीने खेळला. या ट्रोलिंगला आता शुभमन गिलने उत्तर दिलं आहे. गिलने टि्वटरवर एक पोस्ट शेअर करताना ससा आणि कासवाचा इमोजी शेअर केलाय.

ट्रोलर्सना विचारलं तुम्हाला काय हवं?

ट्रोलर्सना शुभमन गिलने ससा आणि कासवाच्या गोष्टीची आठवण करुन दिली. या कथेमध्ये अत्यंत धीम्या गतीने चालूनही कासव शर्यत जिंकतो. पोस्टच्या माध्यमातून गिलने ट्रोलर्सना हे सुद्धा विचारलय की, तुम्हाला काय पाहिजे?. कासवासारखं धीम्यागतीने चालून संघाला विजय मिळवून देणं की, सशासारख वेगाने खेळून टीमला हरवणं.

हार्दिकचा निर्णय चुकला असंच वाटलं

लखनौ विरुद्ध गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातची फलंदाजी पाहून हार्दिकचा हा निर्णय चुकलाय असंच वाटलं. शुभमनने काल T 20 नाही, तर वनडे स्टाइल फलंदाजी केली. त्याने 49 चेंडूत 63 धावा फटकावल्या. त्यामुळे गुजरातचा संघ 144 पर्यंत पोहोचला. लखनौचा संपूर्ण डाव 13.5 षटकात 82 धावात आटोपला. लखनौकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 27 धावा केल्या. क्विंटन डि कॉक 11 आणि आवेश खानने 12 धावा केल्या. तेवतियाने 16 चेंडूत चार चौकारांसह 22 धावा केल्या. खासकरुन आवेश आणि मोहसीन खानने भेदक मारा केला. आवेश खानने मॅथ्यू वेड आणि हार्दिक पंड्या हे दोन महत्त्वाचे विकेटस मिळवले.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.