
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 2025 या साखळीतील शेवटच्या कसोटी मालिकेचा अप्रतिम शेवट केला आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला घरात लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेलं 75 धावांचं आव्हान मिळालं होतं. पाहुण्यांनी हे आव्हान 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 2 सामन्यांची मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. ऑस्ट्रेलियाचे 4 खेळाडू हे दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयाचे शिल्पकार ठरले. मॅथ्यू कुहनमॅन आणि नॅथन लायन या दोघांनी फिरकीच्या जोरावर एकूण 14 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि एलेक्स कॅरी या दोघांनी शतकी खेळी केली.
उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा गॉलमध्ये खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला दुसर्या डावात 231 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे कांगारुंना विजयासाठी 75 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि ट्रेव्हिस हेड ही सलामी जोडी मैदानात आली. हेड 23 बॉलमध्ये 20 रन्स करुन आऊट झाला. प्रभात जयसूर्यान याने हेडला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लबुशेन या दोघांनी ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. ख्वाजा आणि लबुशेन या दोघांनी अनुक्रमे 27 आणि 26 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने विजय, श्रीलंकेला व्हाईटवॉश
Australia on the cusp of a 2-0 Test series win in Sri Lanka.#WTC25 | #SLvAUS 📝: https://t.co/PVPw6kFuGn pic.twitter.com/8iZf98uUPn
— ICC (@ICC) February 9, 2025
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत सामन्यात श्रीलंकेवर जबरदस्त विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने गॉलमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर 1 डाव आणि 242 धावांनी विजय मिळवला होता.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), पथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, लाहिरू कुमारा
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), ब्यू वेबस्टर, कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन.