AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : श्रीलंका बांग्लादेश दुसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर, चौथ्या दिवशीच लागणार निकाल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील बांग्लादेश श्रीलंका मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. या मालिकेतील निकालामुळे मालिका विजयाचं गणित सुटणार आहे. चला जाणून घेऊयात

SL vs BAN : श्रीलंका बांग्लादेश दुसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर, चौथ्या दिवशीच लागणार निकाल
SL vs BAN : श्रीलंका बांग्लादेश दुसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर, चौथ्या दिवशीच लागणार निकालImage Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jun 27, 2025 | 6:32 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील श्रीलंका बांग्लादेश कसोटी मालिका सुरु आहे. दोन सामन्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. तर दुसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. पहिल्या डावात बांग्लादेशने 247 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने जबरदस्त खेळी केली. सर्व गडी गमवून 458 धावा केल्या आणि 211 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे मिळालेल्या आघाडीमुळे श्रीलंकेचा विजय निश्चित झाला आहे. पहिल्या डावात पाथुम निस्संकाने 158 आणि दिनेश चंडिमल याने 93 धावांची खेळी केली. तर मधल्या फळीत कुसल मेंडिसने 84 धावांची खेळी केली. यामुळे बांग्लादेशचा संघ बॅकफूटवर गेला. बांग्लादेशला आता 211 धावांची आघाडी मोडून विजयासाठी धावा देण्याचं आव्हान आहे. पण हे आघाडी मोडताना बांग्लादेशचं कंबरडं मोडल्याचं दिसत आहे. बांग्लादेशचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत गेला आहे.

श्रीलंकेने पहिल्या डावात घेतलेली 211 धावांची आघाडी मोडून काढताना तिसऱ्या दिवसअखेर 115 धावांवर 6 गडी गमावले आहेत. अजूनही बांग्लादेशचा संघ 96 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे या सामन्यात श्रीलंकेचा विजय जवळपास निश्चित आहे. श्रीलंकेकडून प्रभाथ जयसूर्या आणि धनंजय डीसिल्वा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर असिथ फर्नांडो आणि थरिंदू रत्नायके याने एक एक गडी बाद केला आहे. तिसऱ्या दिवसांचा खेळ संपला तेव्हा लिटन दास नाबाद 13 धावांवर खेळत होता. आता बांगलादेशच्या हातात 4 विकेट असून 96 धावांचं आव्हान मोडून विजयासाठी धावा द्यायच्या आहेत. त्यामुळे हा सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या पारड्यात झुकलेला आहे.

श्रीलंकेने हा सामना जिंकल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ होणार आहे. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ एका विजयासह 100 टक्के विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेने विजय मिळवल्यानंतर 66.67 विजयी टक्केवारी होणार आहे. तर बांग्लादेशच्या विजयी टक्केवारीत घट होणार आहे. बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 16.67 टक्के होणार आहे.

Follow Us
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.