AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंकेची बांगलादेशवर 7 विकेट राखून मात, कर्णधार म्हणाला..

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 7 विकेट राखून पराभव केला. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

SL vs BAN : पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंकेची बांगलादेशवर 7 विकेट राखून मात, कर्णधार म्हणाला..
SL vs BAN : पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंकेची बांगलादेशवर 7 विकेट राखून मात, कर्णधार म्हणाला..Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jul 10, 2025 | 10:37 PM
Share

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंकन संघ भारी ठरला. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावा दिल्या. बांगलादेशकडून परवेझ इमोनने सर्वाधिक 38 धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद नईमने नाबाद 32 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त मेहीदी मिराजने 29, टान्झिद हसनने 16, तौहिद हृदोयने 10, तर लिटन दास 6 धावा करून बाद झाले. तर शमिम होसैनने नाबाद 14 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून थीक्षाणाने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर एन तुषारा, शनाका आणि वांडरसे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विजयी धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 78 धावा केल्या आणि विजय सोपा झाला.

पाथुम निस्संका आणि कुसल मेंडिस या जोडीने पहिल्या विकेटसाठी 78 धावांची खेळी केली. पाथुम निस्संका 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुसल मेंडिसने आक्रमक खेळी करत 51 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 73 धावा केल्या. कुसल परेरा 24 धावा करून बाद झाला. तिथपर्यंत विजय जवळ आला होता. अविष्का फर्नांडोने नाबाद 11 आणि चरिथ असलंकाने नाबाद 8 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने 1 षटक आणि 7 विकेट राखून बांगलादेशवर विजय मिळवला. या विजयाचा मानकरी कुसल मेंडिस ठरला.

श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने सांगितलं की, ‘ मला वाटतं जेव्हा आम्ही एलपीएलमध्ये खेळायचो, तेव्हा वेगवान आउटफिल्ड आणि लहान बाउंड्रीमुळे पाठलाग करणाऱ्या संघांना विजय मिळत असे, म्हणूनच आम्ही पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. जेफ्री वँडरसे अनेक वर्षांपासून आमच्यासोबत आहे. त्याला संघात वानिंदू असल्याने संधी मिळाली नाही, पण ही एक चांगली डोकेदुखी आहे. या सामन्यात फारशी सुधारणा झाली नाही, आम्ही खेळाच्या सर्वच भागात चांगले होतो, आम्ही कदाचित चांगले क्षेत्ररक्षण करू शकतो. चेंडू जुना झाल्यामुळे खेळपट्टी हळू होते.’

बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने सांगितलं की, ‘मला वाटत नाही की टॉस महत्त्वाचा होता, पण आम्हाला जास्त धावा मिळाल्या नाहीत. काही चेंडू कमी राहिले आणि दुसऱ्या हाफमध्येही तसेच झाले. हे फक्त आजच्या सामन्याचे नाही, गेल्या 7-8 सामन्यांचे आहे, मला वाटते की खेळणाऱ्या फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. आमच्या गोलंदाजांसाठी 170 धावसंख्या चांगली असती, ते चांगले नव्हते, तस्किन आमचा प्रमुख गोलंदाज आहे आणि कोणाचाही दिवस वाईट असू शकतो. रिशाद खूप सुधारणा करत आहे.ट

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.