IND vs NZ मालिकेदरम्यान या खेळाडूची वनडे आणि टी 20i सीरिजसाठी कर्णधारपदी नियुक्ती

T20i Odi Series : 2 टी 20i आणि 3 एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही मालिकेत एकच खेळाडू टीमचं नेतृत्व करणार आहे.

IND vs NZ मालिकेदरम्यान या खेळाडूची वनडे आणि टी 20i सीरिजसाठी कर्णधारपदी नियुक्ती
nz and india player shubman gill
Image Credit source: Hannah Peters/Getty Images
| Updated on: Oct 23, 2024 | 10:28 PM

न्यूझीलंड क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकूण 3 सामन्यांच्या मालिकेत टॉम लॅथम याच्या नेतृत्वात 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंड या कसोटी मालिकेनंतर श्रीलंका दौरा करणार आहे. न्यूझीलंड या श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20i मालिका 2 तर एकदिवसीय मालिका 3 सामन्यांची असणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने या टी 20i मालिकेसाठी हंगामी कर्णधाराची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. न्यूझीलंड टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच टी 20i सीरिज खेळणार आहे.

न्यूझीलंडचा कॅप्टन कोण?

न्यूझीलंडचा स्टार स्पिन ऑलराउंडर मिचेल सँटनर याची हंगामी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सँटनर या दोन्ही मालिकांमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तसेच न्यूझीलंडकडून या वर्षाअखेरीस मायदेशात होणाऱ्या मालिकेवेळेस पूर्ण वेळ कर्णधाराची नियुक्ती केली जाणार आहे. न्यूझीलंड नुकताच श्रीलंका दौरा केला होता. न्यूझीलंडला या दौऱ्यातील कसोटी मालिकेत श्रीलंकेकडून 0-2 ने पराभूत व्हावं लागलं होतं.

या खेळाडूंना पहिल्यांदाच संधी

न्यूझीलंडकडून पहिल्यांदाच 2 युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ऑलराउंडर नाथन स्मिथ आणि विकेटकीपर बॅट्समन मिच यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच विल यंग, मार्क चॅपमॅन, हेन्री निकोलस, टीम रॉबिन्सन आणि जोश क्लार्कसन यांचाही समावेश आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी न्यूझीलंड टीम

तर टॉम ब्लंडेल, डेव्हॉन कॉन्वहे, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल, विलियम ओ रुर्के, रचीन रवींद्र, टीम साऊथी आणि केन विलियमसन या युवा- अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड मायदेशात 28 नोव्हेंबरपासून इंग्लंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

टी 20i आणि वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला टी 20i सामना, शनिवार, 9 नोव्हेंबर, दांबुला

दुसरा टी 20i सामना, रविवार, 10 नोव्हेंबर, दांबुला

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, बुधवार, 13 नोव्हेंबर, दांबुला

दुसरा सामना, रविवार, 17 नोव्हेंबर, पल्लेकेले

तिसरा सामना, मंगळवार, 19 नोव्हेंबर, पल्लेकेले

श्रीलंका दौऱ्यातील वनडे आणि टी 20i सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सेंटनर (कॅप्टन), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, जोश क्लार्कसन, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, जॅक फाउल्केस, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिच हे (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टिम रॉबिन्सन, नाथन स्मिथ, ईश सोढी आणि विल यंग.