
Smriti Mandhana Started Training: टीम इंडियाच्या खेळाडूंचा सराव करतानाचे अनेक छायाचित्र तुम्ही पाहिली असतील. पण वर्ल्ड चॅम्पियन स्मृती मानधनाची एक फोटो एकदम खास आलाय. तो सध्या समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. भारत आणि श्रीलंका सामन्याला आता अवघे दोन आठवडे उरले आहेत. 21 डिसेंबरपासून 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी विश्वचषक विजेत्या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने सराव सुद्धा सुरू केला आहे. ती मैदानावर घाम गाळताना दिसली. तिचा फोटो पाहुन चाहत्यांनी कडक सॅल्यूटच मारला आहे. सगळं म्हणताय काय जबरदस्त पोरगी आहे. तिचे देशभरातून कौतुक होत आहे.
आतापर्यंत लग्नाची चर्चा
जवळपास दोन आठवड्यापूर्वी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना ही विश्वचषक ट्रॉफीशिवाय तिच्या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटोंमुळे एकदम चर्चेत आली. समजो हो ही गया आणि इतर गाण्यांवर थिरकणारा महिला संघ आणि लग्नाचा माहोल बरंच काही सांगून जात होता. सगळीकडं स्मृतीच्या लग्नाची चर्चा सुरू होती. पण 23 नोव्हेंबर रोजी अचानक काही गडबड झाली आणि लग्न पुढे ढकलले गेले. तर काल रविवारी (7 डिसेंबर) तिने लग्न रद्द करण्याची खबरबात स्वतः सांगितली. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि आता पुढे जाण्याची वेळ आल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
अशा जीवलग मैत्रिणी कुणाच्या नशिबात?
23 नोव्हेंबर रोजी लग्न टळल्यानंतर, वडील रुग्णालयात असताना स्मृतीने स्वतःला सावरलं. या वैयक्तिक संकटात स्मृतीला जेमाईमा रोड्रिगज, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि श्रेयांका पाटील सारख्या मैत्रिणींनी खंबरी पाठिंबा दिला. अशा जीवलग मैत्रिणी कुणाच्या नशिबात असतात नाही? ही मैत्रीच तिला संकटात ऊर्जा देऊन गेली.
स्मृती मानधनाची नेट प्रॅक्टिस जोमात
स्मृती जणू स्टीलची बनलीये
खासगी आयुष्यात पेल्यातील वादळ आलं तरी स्मृती डगमगली नाही. तिने सर्व घडामोडीतून स्वतःला सावरलं. कुटुंबाला सावरलं. तिने घरीच क्रिकेटचा सराव पण सुरु केला. स्मृतीच मैत्रिण, महाराष्ट्र संघाची माजी कर्णधार सोनिया डबीर सांगते की वादळ असो की पाऊस, स्मृती तिचा सराव सहजासहजी चुकवत नाही. ती संकटांचा सामना करते. ती अढळ राहते. त्यामुळे अनेक जण म्हणतात की ती जणू स्टीलची बनलीये.
स्मृतीने लग्न मोडल्याचे जाहीर करताना जी पोस्ट लिहिली त्यातच तिने तिची दिशा स्पष्ट केली आहे. माझं असं मत आहे की, “आपल्या प्रत्येकाचं एक मोठे ध्येय आहे. माझ्यासाठी माझ्या देशाला सर्वात उंचावर प्रतिनिधीत्व करण्याचे ध्येय आहे. मला आशा आहे की मी शक्य तितके वेळा देशासाठी खेळत राहील आणि ट्रॉफी जिंकेल. माझं लक्ष नेहमी तिथेच राहील.”