AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana: ‘अखेर परतली!’ स्मृती मानधनाच्या त्या पोस्टने इंटरनेटवर धमाका! लग्न मोडल्यानंतर आता मैदान गाजवणार

Smriti Mandhana-Palash Muchhal: भारतीय महिला क्रिकेट संघाची धमाकेदार खेळाडू स्मृती मानधना हिने आयुष्यातील लग्नाचा कटू अनुभव लागलीच दूर सारला. आता तिने पुढे काय करायचे हे पण लागोलाग सांगून टाकले. तिने याविषयीची पोस्ट करताच इंटरनेटवर कमेंटचे वादळ आले. तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

Smriti Mandhana: 'अखेर परतली!' स्मृती मानधनाच्या त्या पोस्टने इंटरनेटवर धमाका! लग्न मोडल्यानंतर आता मैदान गाजवणार
स्मृती मानधना, पलाश मुच्छलImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 07, 2025 | 2:54 PM
Share

Finally Back Viral Post: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि उपकर्णधार स्मृती मानधना हिने लग्न मोडल्यावर शिक्कामोर्तब केले. पण त्याचवेळी तिने या दुःखात न अडकण्याचा निर्णयही घेऊन टाकला. तिने पुढची दिशा, नियोजन अगोदरच निश्चित केले. तिची सोशल मीडियावर पोस्ट सध्या चर्चेत आहे. लग्न सोहळा रद्द केल्याच्या दोन आठवड्यानंतर तिने ही पोस्ट केली. लग्नाच्या दिवशी तिच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. तर वर पलाश मुच्छल याला ही अस्वस्थ वाटले होते. त्यानंतरचा इतिहास सर्वांसमोर आहे. पण या काळात ती मनाने खंबीर झाल्याचे नवीन पोस्टमधून दिसून येते. तिच्या नवीन पोस्टवर चाहत्यांनी गरडा घातला. तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. स्मृती आता मैदान गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत तिने या पोस्टमधून दिले.

तो Video इंटरनेटवर Viral

स्मृती मानधना हिने या सर्व घाडामोडी घडण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पेड पार्टनरशीप व्हिडिओ शेअर केला. त्यात तिचा क्रिकेटचा प्रवास आणि तिच्या कामगिरीचा वाढता आलेख तिने मांडला. 23 नोव्हेंबर 2025 रोजीनंतर या व्हिडिओच्या माध्यमातून ती पहिल्यांदा सार्वजनिकरित्या समोर आली. त्या दिवशी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे आणि त्यांना सर्वहित रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतरचा हा तिचा पहिला सार्वजनिक व्हिडिओ आहे.

अखेर ती परतली!

हा व्हिडिओ जेव्हा लाईव्ह करण्यात आला. तेव्हा त्याच्यावर प्रेक्षक, तिचे फॅन्स तुटून पडले. या व्हिडिओवर कमेंट्सचा महापूर आला. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. अनेकांनी आशीर्वाद दिले. अखेर ती परतली. Babygirl is back! अशा कमेंट्सचा पाऊस पडला. ‘तू चांगली असशील अशी आशा करतो.’ ‘तू जो काही निर्णय घेशील तो योग्य असेल दीदी’ अशा काळजी घेणाऱ्या आणि तिचे धाडस वाढवणाऱ्या कमेंट्सचा पाऊसही पडला. या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे.

वैयक्तिक आयुष्यात वादळ आले असले तरी क्रिकेट जगतात स्मृतीचे नाणे खणखणीत पणे वाजले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू(RCB) संघाने, WPL 2026 मधील जाहीर लिलावात तिच्यासाठी 3.5 कोटींची बोली लावली. तिच्यासाठी संघाने आतापर्यंतची सर्वात मोठी बोली लावल्याचे मानले जाते. स्मृती आता क्रिकेट मैदान गाजवणार हे स्पष्ट झाले आहे. जागतिक महिला क्रिकेट स्पर्धेत 2025 मध्ये 434 धावा ठोकत सर्वाधिक धावांचा डोंगर उभी करणारी दुसरी महिला खेळाडू ठरली आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.