NZ vs BAN : सॉफ्ट सिग्नल पुन्हा चर्चेत, काइली जॅमीसनचा अफलातून कॅच, तिसऱ्या अंपायरने निर्णय बदलला, पुढे इकबालने ठोकलं…!

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत 15 व्या ओव्हरमध्ये सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयाने पुन्हा दोन्ही संघांना विचार करायला भाग पडलं.

NZ vs BAN : सॉफ्ट सिग्नल पुन्हा चर्चेत, काइली जॅमीसनचा अफलातून कॅच, तिसऱ्या अंपायरने निर्णय बदलला, पुढे इकबालने ठोकलं...!
Soft Signal Video kyle Jamieson ClaimedStunning Catch Third umpire overrule Decision
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 2:29 PM

मुंबई : सॉफ्ट सिग्नलचा  (Soft Signal) निर्णय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश दरम्यान (NZ vs BAN) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जलदगती गोलंदाज कायली जॅमीसनने अफलातून कॅच पकडला. ज्या कॅचला मैदानावरच्या अंपायरने आऊट निर्णय दिला मात्र तिसऱ्या अंपायरने तो निर्णय बदलून नॉट आऊट निर्णय दिला. त्यानंतर इक्बालने मॅचवर ताबा घेऊन 78 रन्स काढले. (Soft Signal Video kyle Jamieson ClaimedStunning Catch Third umpire overrule Decision)

नेमका काय प्रकार झाला?

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत 15 व्या ओव्हरमध्ये सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयाने पुन्हा दोन्ही संघांना विचार करायला भाग पडलं. बांगलादेशी बॅट्समन तमीम इक्बालने सुंदर फटका खेळला. जॅमीसनने अत्यंत चपळाईने तो कॅच पकडला. मात्र तो कॅच पकडताना जॅमीसन पूर्णपणे नियंत्रणात नव्हता.

मैदानी अंपायरने यावेळी सॉफ्ट सिग्नल आऊट दिला. थर्ड अंपायरने झूम इन-आऊट करताना त्यांच्या लक्षात आलं की बॉल जमिनीला स्पर्श करतोय. त्यानंतर त्यांनी मैदानावरच्या अंपायरचा निर्णय बदलला. इक्बाल त्यावेळी 34 रन्सवर बॅटिंग करत होता. सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयानंतर तमीमने 108 चेंडूत 78 रन्स केले. यावेळी त्याने 50 वी अर्धशतक साजरं केलं. या खेळीत त्याने 11 चौकार मारले. त्यानंतर जिमी निशमने त्याला आऊट केलं.

काय आहे सॉफ्ट सिग्नल?

जर ग्राऊंड अम्पायर एखाद्या निर्णयावर ठाम नाहीत त्यावेळी ते तिसऱ्या अंपायरची मदत घेतात परंतु ती घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो त्यालाच सॉफ्ट सिग्नल असं म्हणतात. हा सिग्नल आऊट किंवा नॉटआऊटचा असतो. आता थर्ड अंपायरने पण एखाद्या निर्णयावेळी 100 टक्के खात्रीशीर नसतील तर अशावेळी ते मैदानी अंपायरने दिलेल्या सॉफ्ट सिग्नलवर आपला पुढील निर्णय घेतात. अशावेळी मैदानी अंपायरने दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो. सॉफ्ट सिग्नल आणण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टू डायमेंशनल टीव्ही कॅमेरामध्ये व्हिज्युअल्स क्लिअर न दिसणे. याचमुळे बहुदा थर्ड अंपायर बॅट्समनला नॉट आऊट द्यायचे.

सॉफ्ट सिग्नलमध्ये बदलासाठी प्रस्ताव

सॉफ्ट सिग्नलमध्ये अनेक वेळा फलंदाजांना कारण नसताना तंबूत परतावं लागत आहे. अशावेळी सॉफ्ट सिग्नलमध्ये बदलासाठी प्रस्ताव आणण्याच्या विचार सुरु आहे.

(Soft Signal Video kyle Jamieson ClaimedStunning Catch Third umpire overrule Decision)

हे ही वाचा :

अंपायनरने दिलेला सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय? ज्याच्यामुळे सूर्यकुमारची खेळी संपुष्टात आली!

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.