AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav ganguly ला IPL मध्ये मिळाली मोठी जबाबदारी, ‘या’ टीमच्या डायरेक्टरपदी निवड

Sourav ganguly ला एकाचवेळी तीन टीम्सची जबाबदारी संभाळावी लागणार आहे. गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी फेरनिवड होऊ शकली नव्हती

Sourav ganguly ला IPL मध्ये मिळाली मोठी जबाबदारी, 'या' टीमच्या डायरेक्टरपदी निवड
Sourav GangulyImage Credit source: instagram
| Updated on: Jan 03, 2023 | 5:06 PM
Share

नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्ससाठी मागचा सीजन खास नव्हता. या सीजनमध्येही दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली आहे. या टीमचा कॅप्टन ऋषभ पंतच्या गाडीला मागच्या आठवड्यात मोठा अपघात झाला. त्यामुळे ऋषभला पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागणार आहे. आयपीएलमध्ये तो खेळेल की, नाही, या बद्दल आत्ताच काही ठामपणे सांगता येणार नाही. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने टीम इंडियाच्या माजी कॅप्टनला आपल्यासोबत जोडलं आहे. आयपीएल 2023 साठी बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची टीमच्या संचालकपदी निवड करण्यात आलीय.

सौरव गांगुलीवर आणखी कुठल्या टीम्सची जबाबदारी

पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. आयपीएलशी संबंधित सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. सौरव गांगुलीने ऑक्टोबरमध्ये बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सौरव गांगुली आता दिल्ली कॅपिटल्सचा संचालक असेल. त्याशिवाय या फ्रेंचायजीच्या दुबई कॅपिटल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स टीम्सची जबाबदारी संभाळेल. दिल्ली कॅपिटल्सने दुबई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगमधील संघ विकत घेतलेत.

आधी सुद्धा भाग होता

सौरव गांगुली यावर्षी दिल्ली कॅपिटल्समधून पुनरागमन करेल. फ्रेंचायजी आणि त्याच्यामध्ये या संदर्भाच चर्चा झालीय. त्याने या फ्रेंचायजीसोबत काम केलय. आयपीएलमध्ये त्याला काम करायच असेल, तर ती दिल्ली कॅपिटल्सची टीम असेल. आयपीएलशी संबंधित सूत्राने गोपनियतेच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली.

याआधी सुद्धा मेंटॉर होता

गांगुली 2019 साली दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर होता. अलीकडेच झालेल्या लिलावात फ्रेंचायजीने मुख्य कोच रिकी पॉन्टिंग आणि गांगुलीने दिलेल्या सल्ल्याच पालन केलं. काही वादही झाले

सौरव गांगुली ऑक्टोबर 2019 मध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष झाला. गांगुलीच्या कार्यकाळात काही वादही झाले. सौरव आणि विराट कोहलीमध्ये मतभेदाच्या बातम्या समोर आल्या.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.