T20i World Cup 2026 : स्टार ऑलराउंडरला दुखापत, टीमला टेन्शन, वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार?
Icc T20I World Cup 2026 : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आतापर्यंत अनेक खेळाडूंना दुखापत झालीय. त्यापैकी काही खेळाडूंना दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. तर काही खेळाडूंना दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार की नाही? याबाबत प्रश्न आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाउन सुरु झालं आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सूकतेचं वातावरण आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत 20 पैकी बहुतांश क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. तर काहींनी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बहुतांश संघ शेवटची टी 20i मालिका खेळून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. त्याआधी गतउपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मॅचविनर ऑलराउंडरला दुखापत झालीय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची डोकेदुखी वाढली आहे.
ऑलराउंडर डोनोवन फरेरा फरेराला दुखापत
वर्ल्ड कप स्पर्धेला 3 आठवडे शेष असताना ऑलराउंडर डोनोवन फरेरा याला दुखापत झालीय. फरेरा दुखापतीमुळे साऊथ अफ्रिका 20 लीग स्पर्धेतून बाहेर झाला आहे. फरेराला 17 जानेवारीला जोबर्ग सुपर किंग्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिट्ल्स यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली.
फरेरा कव्हर बाउंड्रीवर फिल्डिंग करत होता. फरेराने चौकार रोखण्यासाठी उडी मारली. फरेरा चौकार रोखण्याच्या प्रयत्नात खांद्यावर पडला. त्यानंतरही फरेरा बॅटिंगसाठी आला. मात्र त्याला 1 बॉलच खेलता आला. फरेराला हाताची हालचाल करण्यात त्रास जाणवत होता. त्यामुळे फरेराला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फरेराच्या खांद्याला फ्रक्चर झालं आहे.
फरेरा थ्री इन वन खेळाडू आहे. फरेराची आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फिनिशर, बॅकअप विकेटकीपर आणि पार्ट टाईम बॉलर म्हणून निवड करण्यात आली. मात्र त्याच्या या दुखापतीमुळे टीमचं टेन्शन वाढलंय. फरेराला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागल्यास त्याच्या जागी रायन रिकेल्टन याचा समावेश केला जाऊ शकतो. रिकेल्टनने एसए20 स्पर्धेत 2 शतकं झळकावली. तसेच रिकेल्टन विकेटकीपिंगही करतो. तसेच फरेराच्या जागेसाठी ट्रिस्टन स्टब्स आणि मॅथ्यू ब्रिट्झके या दोघांच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.
टॉनी डी झॉर्जीबाबत अपडेट काय?
दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या टॉनी डी झॉर्जी याच्यासमोर फिटनेस सिद्ध करण्याचं आव्हान आहे. टॉनीला डिसेंबर महिन्यात दुखापत झाली होती. नियमानुसार, दुखापतीनंतर खेळाडूला स्वत: खेळण्यासाठी फिट असल्याचं सिद्ध करावं लागलं. त्यासाठी त्या खेळाडूला ठराविक प्रक्रियेतून जावं लागतं. आता झॉर्जी विंडीज विरूद्ध जानेवारीच्या शेवटी होणाऱ्या टी 20i मालिकेत खेळेल, अशी आशा क्रिकेट बोर्डाला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 27 जानेवारीपासून 3 टी 20i क्रिकेट सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता झॉर्जी आणि फरेरा या दोघांच्या दुखापतीबाबत काय अपडेट समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
