दक्षिण अफ्रिकेवर सुपर 8 फेरीतील सलग दोन सामने जिंकूनही बाद होण्याची भीती, जाणून घ्या गणित
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतून कोणत्याही संघाने उपांत्य फेरी गाठलेली नाही. गट 2 मध्ये तर खूपच विचित्र गणित झालं आहे. तसं पाहिलं तर चारही संघांचा शेवटचा सामना शिल्लक आहे. त्यात चारही संघांना संधी मिळू शकते. त्यामुळे जर तरच्या गणितात दोन सामने जिंकूनही दक्षिण अफ्रिका आऊट होऊ शकते.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. यात दोन सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्याची संधी आहे. असं असताना गट 2 मध्ये विचित्र गणित झालं आहे. त्यामुळे सलग दोन सामने जिंकूनही दक्षिण अफ्रिकेचं टेन्शन वाढलं आहे. कारण जर तरच्या गणितात उपांत्य फेरीचं गणित बिघडू शकतं. कारण या गटातील शेवटचे दोन सामने एकमेकांवर आधारित आहे. जरा तरी गडबड झाली तर उपांत्य फेरीचं संपूर्ण चित्र फिस्कटू शकतं. या फेरीतील शेवटचा सामना दक्षिण अफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध अमेरिका असा आहे. या गटातून दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्याकडे उपांत्य फेरीची संधी आहे. तर अमेरिकेचं गणित शेवटचा जिंकूनही जर तर आणि नेट रनरेटवर आधारित आहे. सलग दोन सामने जिंकूनही दक्षिण अफ्रिकेचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगू शकतं. कसं ते जाणून घेऊयात.
सुपर 8 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंड आणि अमेरिकेला पराभूत केलं आहे. आता शेवटचा सामना वेस्ट इंडिजसोबत आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका या दोघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दक्षिण अफ्रिकेने हा सामना जिंकला तर थेट उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. पण गमावला तर पूर्ण चित्रच बदलून जाईल. दक्षिण अफ्रिकेला वेस्ट इंडिजने पराभूत केलं तर एकूण 4 गुण होतील. सध्या दक्षिण अफ्रिकेचे 4 गुण आहेत. दुसरीकडे इंग्लंडने अमेरिकेला पराभूत केलं तर 4 गुण होतील. अशा स्थितीत तीन संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी दोन संघांचा निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल.
दोन्ही संघाचे खेळाडू
दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, रायन रिकेल्टन, ओटनील बार्टमन, ब्योर्न फोर्टुइन, जेराल्ड कोएत्झी
वेस्ट इंडीज संघ: ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, शाई होप, शिमरॉन हेटमायर, ओबेद मॅककॉय, शामर जोसेफ.
