Retirement | टीम इंडिया-आफ्रिका टेस्टनंतर ‘या’ खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Test Cricket Reitirement : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेली कसोटी मालिका सर्वांच्या लक्षात राहणारी आहे. पहिल्या सामन्यात डावाने राहिलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात अवघ्या यजमानांना 55 धावांवर ऑल आऊट केलं होतं. अशातच मोठी बातमी समोर आली आहे.

Retirement | टीम इंडिया-आफ्रिका टेस्टनंतर 'या' खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 4:59 PM

मुंबई  : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली.  दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली, पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत आफ्रिका संघावर सात विकेटने विजय मिळवला होता. दोन सामन्यांची मालिका झाल्यावर स्टार आणि आक्रमक खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा स्टार खेळाडु दुसरा तिसरा कोणी नसून हेनरिक क्लासेन आहे. टीम इंडियाविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये क्लासेन याचा संघामध्ये समावेश नव्हता. 2019 साली क्लासेन याने डेब्यू केला होता. तर 2023 साली त्याने शेवटचा सामना खेळला होता. चार वर्षांमध्ये त्याने अवघे चार कसोटी सामने खेळले होते. यामध्ये त्याने अवघ्या 105 धावा काढता आल्या होत्या. टीम इंडियाविरूद्ध झालेल्या मालिकेमध्ये क्लासेन याच्या जागी काइल व्हॅरियन याची संघात वर्णी लागली होती.

काय म्हणाला क्लासेन?

मैदानावर आणि मैदानाबाहेर घडलेल्या गोष्टींमुळे मी आज क्रिकेटर बनलोय. हा एक सुंदर प्रवास राहिला असून मला आनंद आहे की देशाचं प्रतिनिधित्त्व केलं. माझी बैगी टेस्ट कॅप सर्वात किमती कॅप आहे. ज्यांनी रेड बॉल क्रिकेट करियरमध्ये मला पाठिंबा दिला अशा सर्वांचे सर्वांना धन्यवाद, असं क्लासेन यांनी म्हटलं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी क्लासेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. इतक्या कमी वयात आणि अवघ्या चार वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केल्याने क्रीडा चाहते अनेक तर्क वितर्क लावत आहेत.

दरम्यान,  हेनरिक क्लासेन याने साऊथ आफ्रिकेकडून 54 वन डे सामन्यांमध्ये 1723 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये 43 सामन्यांमध्ये 722 धावा केल्या आहेत. साऊथ आफ्रिकेचा एक आक्रमक फलंदाज अशी त्याची ओळख आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.