Rajat Patidar चा तडाखा, सलग 4 सिक्स ठोकत 19 बॉलमध्ये विस्फोटक अर्धशतक

| Updated on: Apr 25, 2024 | 9:54 PM

Rajat Patidar : रजत पाटीदार याला आयपीएलच्या 17 व्या मोसमात खास कामगिरी करता आली नाही. मात्र त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलं. इतकंच नाही, तर रजतने या दरम्यान सलग 4 सिक्स ठोकले.

Rajat Patidar चा तडाखा, सलग 4 सिक्स ठोकत 19 बॉलमध्ये विस्फोटक अर्धशतक
rajat patidar srh vs rcb,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाज रजत पाटीदार याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात विस्फोटक कामगिरी केली आहे. रजतने सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत इतिहास रचला आहे. रजत आयपीएलमध्ये आरसीबीसाठी वेगवान अर्धशतक करणारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला. रजत पाटीदार याने अवघ्या 19 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. विशेष म्हणजे या दरम्यान रजतने सलग 4 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकले. रजतने त्याच्या डावातील पहिल्या 10 बॉलमध्ये 21 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावातील 11 व्या ओव्हरमध्ये मयंक मार्कंडेला ठोकून काढला. रजतने मयंकच्या या ओव्हरमध्ये सलग 4 सिक्स ठोकले. मयंकला या ओव्हरमध्ये एकूण 27 धावा मिळाल्या, त्यापैकी 24 धावा या 4 सिक्सच्या माध्यमातून आल्या. रजत पाटीदार या हंगामात एका ओव्हरमध्ये 4 सिक्स ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला. रजतआधी रोमरियो शेफर्ड आणि ऋषभ पंत या दोघांनी ही कामगिरी केली आहे.

रजत ज्या पद्धतीने खेळत होता, त्याच्याकडे शतकी खेळी अपेक्षित होती. मात्र रजत अर्धशतकानंतर अपयशी ठरला. रजत अर्धशतकानंतर दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला. जयदेव उनाडकटने रजतला आपला शिकार केला. रजत मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. बाउंड्री लाईनवर अब्दुल समद याने कॅच घेतला. रजत पाटीदार याने 20 बॉलमध्ये 2 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 50 धावा केल्या.

रजत पहिलाच भारतीय

रजत आरसीबीसाठी वेगवान अर्धशतक करणारा पहिला भारतीय ठरला. रजत पाटीदार याने याआधी आरसीबीकडून 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलंय. तसेच आरसीबीसाठी वेगवान अर्धशतकाचा विक्रम हा युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याच्या नावावर आहे.ख्रिस गेल याने आरसीबीसाठी 17 बॉलमध्ये अर्धशतक केलं आहे.

रजतचा तडाखा, सलग 4 सिक्स

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.