SL vs BAN : श्रीलंकेने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली, कर्णधार चरिथ असलंका म्हणाला…

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका श्रीलंकेने 3-0 ने जिंकली. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 99 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात कुसल मेंडिस सामनावीराचा मानकरी ठरला.

SL vs BAN : श्रीलंकेने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली, कर्णधार चरिथ असलंका म्हणाला...
श्रीलंकेने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली, कर्णधार चरिथ असलंका म्हणाला...
Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jul 08, 2025 | 10:52 PM

श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकली. तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 285 धावा केल्या आणि विजयासाठी 286 दिल्या. बांगलादेशने 39.4 षटकात 186 धावा केल्या सर्वबाद झाला. श्रीलंकेने हा सामना 99 धावांनी जिंकला. श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना 13 धावांवर धक्का बसला. निशान मदुशका 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर पाथुम निस्सांका 35 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कुसल मेंडिसने एक बाजून सावरून धरली. कमिंदू मेंडिस 16 धावांवर बाद झाल्यानंतर चरीथ असलंकासोबत भागीदारी केली. कुसल मेंडिसने 114 चेंडूत 18 चौकार मारत 124 धावा केल्या. तर असलंकाने 68 चेंडूत 58 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून तोहीद हृदोय वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. असिथा फर्नांडोने 33 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर दुशमंथा चमीराने 51 धावा देत 3 गडी बाद केले. तर वानिंदू हसरंगा आणि कामिंदु मेंडिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने सांगितलं की, ‘आमच्यासाठी हा एक महत्त्वाचा सामना होता आणि खरोखर आनंदी होतो. मला वाटले की खेळपट्टी हळू होती आणि फलंदाजीने गती मिळविण्यासाठी चौकार मारण्याचा प्रयत्न केला. निराशाजनक 40 षटकांनंतर 220 धावा केल्यानंतर आणि आम्ही 300 च्या आसपास दिसत होतो, परंतु आम्ही 20 धावांनी कमी पडलो.’ सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर कुसल मेंडिस म्हणाला की, ‘खूप आनंदी. माझ्या फलंदाजी प्रशिक्षकाने काल मला सांगितले की जर मी चांगला खेळलो तर संघ जिंकेल. गेल्या सामन्यात आम्हाला मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजीशी झुंजावे लागले आणि त्यानंतर मी फलंदाजी प्रशिक्षकाशी गप्पा मारल्या आणि अशा परिस्थितींना कसे तोंड द्यायचे हे शिकलो. पथुमने खूप चांगली फलंदाजी केली आणि चारिथने मला खूप चांगली साथ दिली आणि खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती.’

बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन म्हणाला की’आम्ही शेवटच्या 10 षटकांमध्ये खरोखर चांगली गोलंदाजी केली, फिरकीपटूंनीही चांगली कामगिरी केली. विकेट उत्कृष्ट होत्या आणि आम्ही सकारात्मक फलंदाजी करण्याबद्दल चर्चा केली आणि मधल्या षटकांमध्ये आम्हाला भागीदारी करता आली नाही आणि सुरुवातीला काही विकेट गमावल्यानेही काही फायदा झाला नाही. आमचा संघ तरुण आहे आणि नवीन खेळाडू येत आहेत, आम्ही नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो आणि अधिक संधी मिळाल्यास ते चांगले खेळतील.’