AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत श्रीलंका मालिकेत मोठी गडबड! मॅच रेफरीच्या या चुकीमुळे टीम इंडियाचा विजय निसटला

भारत श्रीलंका वनडे मालिकेत श्रीलंकेकडे 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. एक मालिका बरोबरीत सुटेल किंवा श्रीलंका जिंकेल अशी स्थिती आहे. मिडिया रिपोर्टनुसार, श्रीलंकेतील आयसीसी अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. नेमकं असं काय घडलं ते जाणून घ्या

भारत श्रीलंका मालिकेत मोठी गडबड! मॅच रेफरीच्या या चुकीमुळे टीम इंडियाचा विजय निसटला
| Updated on: Aug 05, 2024 | 3:19 PM
Share

वनडे मालिकेत श्रीलंकन संघ टीम इंडियावर भारी पडला आहे. 50 षटकात 250 च्या आत धावा करणंही भारताला कठीण करून टाकलं आहे. असं एकदा नाही तर दोनदा घडलं. पहिल्या वनडेत 230 आणि दुसऱ्या वनडेत 240 धावा भारताला करता आल्या नाहीत. आता तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कस लागणार आहे. कारण हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. असं असताना वनडे मालिकेतील एक मोठी गडबड समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार शेवटचा वनडे सामना टाय झाला तर सुपर ओव्हर केली जाईल. जर शेवटच्या सामन्यासाठी सुपर ओव्हर असणार आहे. तर पहिल्या वनडेसाठी का नव्हती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या एक अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा करत सांगितलं की, पहिल्या वनडे सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही.

पहिल्या वनडे सामन्यात काय झालं होतं?

पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 230 धावा केल्या आणि विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं. पण भारताला सर्व गडीबाद 230 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. खरं तर आयसीसीच्या नियमानुसार, सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर व्हायला हवी होती. पण आयसीसी मॅच रेफरी रंजन मदुगलेने तसं केलं नाही. इतकंच नाही तर मैदानातील पंच आणि तिसऱ्या चौथ्या पंचांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या सर्वांना सुपर ओव्हर नियमाबाबत माहिती नव्हतं का? असा प्रश्न क्रीडप्रेमी उपस्थित करत आहेत.

वनडे सामना बरोबरीत सुटला तर काय सांगतो आयसीसीचा नियम?

आयसीसी नियमानुसार, दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत असेल तेव्हा विजयी घोषित करण्यासाठी सुपर ओव्हर होणं गरजेचं आहे. जर सुपर ओव्हरमध्येही तशीच स्थिती झाली तर जिंकेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. पण आयसीसीचा हा नियम भारत श्रीलंका वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर लागू झाला नाही. त्यामुळे त्याचा फटका कुठे ना कुठे तरी टीम इंडियाला बसला. सुपर ओव्हरमध्ये भारताने सामना जिंकला असता तर आज मालिकेत 1-1 ने बरोबरी असती. आता आयसीसी या चुकीवर नेमकं काय उत्तर देतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ