AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2nd Test Match : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये फ्री एन्ट्री, क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज

2nd Test Cricket Match Free Entry : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये फुकटात सोडलं जाणार आहे. सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली गेली आहे.

2nd Test Match : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये फ्री एन्ट्री, क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज
Sinhalese Sports ClubImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 24, 2025 | 10:26 PM
Share

दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर गतविजेत्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा धुव्वा उडवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला. त्यानंतर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीला सुरुवात झाली. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 17 जूनपासून सुरुवात झाली. पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. त्यानंतर आता दुसरा आणि अंतिम सामना हा बुधवार 25 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे.

दुसरा आणि अंतिम कसोटी सामना

उभयसंघातील पहिला सामना 17 ते 21 जून दरम्यान गॉलमध्ये खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांत चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी पहिल्या डावात 450 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र सरतेशेवटी सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे 2 सामन्यांची मालिका 0-0 ने बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांचा 25 जूनपासून सुरु होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर नाव कोरण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो येथे होणार आहे.

बांगलादेश की श्रीलंका? कोण जिंकणार?

दोन्ही संघांची ही WTC स्पर्धेच्या इतिहासातील चौथ्या साखळीतील पहिलीच मालिका आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते. बांगलादेशकडे श्रीलंकेला त्यांच्याच घरात नमवण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसमोर मालिका न गमावण्याचं काहीअंशी आव्हान असणार आहे. आता यात कोण यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

स्टेडियममध्ये मोफत प्रवेश

क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये फ्री एन्ट्री

क्रिकेट चाहते श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना फुकटात पाहू शकतात. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये फ्री एन्ट्री ठेवली आहे. क्रिकेट चाहत्यांना गेट नंबर 3 आणि 4 मधून प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती श्रीलंका क्रिकेट या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्याला मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते उपस्थित राहू शकतात.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.