Mumbai : आजपासून टेनिस आयपीएल स्पर्धा, सुप्रिमो चषकाचे नववे पर्व, 16 संघांचा सहभाग

Mumbai : आजपासून टेनिस आयपीएल स्पर्धा, सुप्रिमो चषकाचे नववे पर्व, 16 संघांचा सहभाग
सुप्रिमे चषक स्पर्धा
Image Credit source: social

2010मध्ये सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता.

शुभम कुलकर्णी

|

May 21, 2022 | 2:03 PM

मुंबई : टेनिस क्रिकेटला (tennis cricket) सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून देणाऱ्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेचं आज बगुल सांताक्रूझ क्रिकेट स्पर्धेच्या प्रारंभाने वाजणार आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत 2010मध्ये सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता. गेली 8 वर्षे या स्पर्धेने देशातीलच नव्हे तर 22 देशांतील क्रिकेटप्रेमींत लोकप्रियता मिळवून दिली आहे. भारतातील (India) नंबर वन क्रिकेट स्पर्धा आणि टेनिसचे आयपीएल (Tennis IPL)  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषकाच्या नवव्या पर्वाचे आयोजन महाराष्ट्राचे परिवहन आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब आणि कलिना विधानसभेचे शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या पुढाकाराने होणार आहे. सुप्रिमो दुसरा टप्पा येत्या 24 ते 28 मे 2022 या कालावधीत कलिना येथील एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब मैदानात खेळवला जाणार आहे. आजपासून सांताक्रूझ कलिना विभागातील स्थानिक क्रिकेट संघातील आंतर सांताक्रूझ क्रिकेट स्पर्धा 21 ते 23 मे दरम्यान होणार आहे.

सोळा नामवंत क्रिकेट संघ

सुप्रिमो चषकाच्या पहिल्या टप्प्यात सांताक्रूझ-कलिना विभागातील सोळा नामवंत क्रिकेट संघ जेतेपदासाठी झुंजणार आहेत. या टप्पातील स्पर्धेचं उद्घाटन आज सायंकाळी साडेसहा वाजता कलिना एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब मैदानावरच होणार आहे. सुप्रिमो चषकाच्या आठव्या पर्वातील आंतरसांताक्रूझ क्रिकेट स्पर्धेत कलिना विभागातील कपाडिया पॉइज आणि उत्कर्ष संघांत अंतिम लढत झाली होती. त्यात कपाडिया बॉईज संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावलं होतं.

सोळा संघ सहभागी

वायएनसीसी, लिटिल मास्टर, फ्रोंड्स इलेव्हन, केपी बॉईज, डीएमआर, साईकृपा, शिवशक्ती, समर्थ ओमकार, उत्कर्ष कपाडिया बॉईज, क्रेझी बॉईज, आर के इलेव्हन, कुंचिकोरवे, P & T, श्रीगणेश

हे सुद्धा वाचा

दुसरा टप्पा 24 मे ते 28 मे

भारतातील नंबर वन क्रिकेट स्पर्धा आणि टेनिसचे आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषकाच्या नवव्या पर्वाचे आयोजन महाराष्ट्राचे परिवहन आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब आणि कलिना विधानसभेचे शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या पुढाकाराने होणार आहे. सुप्रिमो दुसरा टप्पा येत्या 24 ते 28 मे 2022 या कालावधीत कलिना येथील एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब मैदानात खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी उद्यापासून सांताक्रूझ कलिना विभागातील स्थानिक क्रिकेट संघातील आंतर सांताक्रूझ क्रिकेट स्पर्धा 21 ते 23 मे दरम्यान होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें