Sunil Gavaskar : लॉकडाऊनमध्ये कोहलीचा अनुष्कासोबत जोरदार सराव ते धोनीच्या ग्लोव्हजबाबत गावसकरांची गाजलेली वादग्रस्त वक्तव्ये

समालोचन करताना निर्भिडपणे गावसकर खेळाडूंवर किंवा निवड समितीवर निशाणा साधतात. गावसकरांची अशी काही वक्तव्य आहेत ज्यामुळे त्यांना माफी मागावी लागली होती. एकदा तर त्यांनी विराट कोहली आणि अनुष्काबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे त्यांना माफी मागावी लागली होती.

Sunil Gavaskar : लॉकडाऊनमध्ये कोहलीचा अनुष्कासोबत जोरदार सराव ते धोनीच्या ग्लोव्हजबाबत गावसकरांची गाजलेली वादग्रस्त वक्तव्ये
| Updated on: Jul 10, 2023 | 7:40 PM

मुंबई : क्रिकेटमधील अनेक वाद पाहिले आहेत, यामध्ये स्लेजिंग किंवा मैदानात खेळाडू एकमेकांना भिडतात. मात्र निवृत्ती घेतल्यावरही काही खेळाडूंच्या वक्तव्यावरून वादंग होतो. यामधी एक म्हणजे भारताचे माजी खेळाडू आणि लिटल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सुनील गावसकर. समालोचन करताना निर्भिडपणे गावसकर खेळाडूंवर किंवा निवड समितीवर निशाणा साधतात. गावसकरांची अशी काही वक्तव्य आहेत ज्यामुळे त्यांना माफी मागावी लागली होती.

सुनील गावसकर यांची वादग्रस्त वक्तव्ये

सुनील गावसकर यांनी स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबाबत 2020 साली वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. लॉकडाऊनमध्ये अनुष्का शर्मासोबत कोहलीने सराव केला होता, असं वक्तव्य गावसकरांनी केलं होतं. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यामुळे अनुष्का शर्माही दुखावली गेली होती, अखेर गावसकरांना या वक्तव्यामुळे माफी मागावी लागली होती.

ऑस्ट्रेलियाचा दिवंगत खेळाडू शेन वार्नबाबतही एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. वॉर्नची भारताविरूद्ध सरासरी कामगिरी असून तो काही सर्वोत्तम दर्जाचा फिरककीपटू नसल्याचं गावसकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना माफी मागावी मागितली होती.

2020 मध्ये टी. नटराजन आणि आर. अश्विन यांच्याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. यावर काहींना त्यांना पाठिंबा दिला होती. जर एखादा फलंदाज नाही खेळला तर त्याला दुसरी संधी मिळणार मात्र तेच एखादा गोलंदाज असेल तर त्यांना बाहेर बसावं लागणार. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम आहेत का? असा सवाल गावसकरांनी केला होता.

दरम्यान, भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांचा आज वाढदिवस आहे. 74 वर्षीय सुनील गावसकरांची अजुनही क्रिकेटची नाळ जुळलेली आहे. लिटल मास्टर यांनी समालोचन करत आपलं क्रिकेटशी नात आता मैदानाबाहेरून जोडलं आहे.