AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : म्हणूनच तुला भारतीय संघात स्थान मिळत नाही, सुनील गावसकर भडकले

विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला.

IPL 2021 : म्हणूनच तुला भारतीय संघात स्थान मिळत नाही, सुनील गावसकर भडकले
Sunil Gavaskar
| Updated on: Apr 23, 2021 | 1:24 PM
Share

IPL 2021 : आयपीएलमध्ये (Indian Premier League) काल विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला. (Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals) RCB ने 10 विकेट राखून राजस्थानवर मोठा विजय मिळवला. राजस्थानचं 177 धावांचं आव्हान, विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल या सलामीच्या जोडीनेच पार केलं. RCB चा हा सलग चौथा विजय ठरला. त्यामुळे RCB गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. दरम्यान, या सामन्यानंतर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे एका भारतीय खेळाडूवर चांगलेच भडकले. (Sunil Gavaskar got angry on Sanju Samson after  IPL 2021 Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals match Virat Kohli)

याच कारनाम्यांमुळे हा तरुण खेळाडू भारतीय संघात अद्याप स्थान मिळवू शकला नाही, असं सुनील गावसकर म्हणाले. हा खेळाडू म्हणजे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन होय.

आधी टॉप, नंतर फ्लॉप

संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळत आहे. पहिल्याच सामन्यात त्याने पंजाबविरुद्ध 119 धावा ठोकल्या होत्या. मात्र त्यानंतर संजूच्या बॅट तळपलीच नाही. पुढच्या तिन्ही सामन्यात संजू 4,1 आणि 21 धावा करुन माघारी परतला. त्याच्या खेळीमध्ये सातत्य नसल्याने, सुनील गावसकर भडकले.

सुनील गावसकर म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे कर्णधाराला सुरुवातीपासून संघाचा मोर्चा सांभाळावा लागतो. संजू पहिल्या सामन्यात जबरदस्त खेळला. मात्र त्यानंतर सातत्याच नाही. हीच त्याची समस्या आहे. त्यामुळेच तो भारतीय संघात स्थान मिळवू शकत नाही”

संजूची बॅट तळपणे आवश्यक

राजस्थान रॉयल्सला चमकदार कामगिरी करायची असेल, तर कर्णधार संजू सॅमसनची बॅट तळपणे आवश्यक आहे, असंही सुनील गावसकर म्हणाले. “संजू सॅमसन एका सामन्यात धावा करतो, दुसऱ्यामध्ये फ्लॉप ठरतो. त्याचं हे असंच सुरु असतं. संजू हा राजस्थानचा महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने धावा करणं हे संघासाठी आवश्यक आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर आता संजूवर आणखी जबाबदारी आली आहे. कर्णधारपदाचं उदाहरण सिद्ध करण्याची संधी त्याच्याकडे आहे”, असं सुनील गावसकरांनी सांगितलं.

फिनिशरची कमतरता

राजस्थानकडे डेव्हिड मिलर आणि क्रिस मॉरिससारखे खेळाडू आहेत, जे आक्रमक फलंदाजी करु शकतात. पण संजूला पहिल्या फळीत धावा करुन, चांगली सुरुवात करुन द्यावी लागेल. कारण त्यांच्याकडे चांगला फिनिशर नाही, असा सल्ला गावसकरांनी दिला.

राजस्‍थान रॉयल्‍सने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. त्यामुळे गुणतालिकेत राजस्थान सर्वात शेवटी आहे.

संबंधित बातम्या 

RCB vs RR 2021, Virat Kohli | कोहलीचा भीमप्रराक्रम, आयपीएलमध्ये ‘विराट’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

RCB vs RR : देवदत्त पडीक्कलचे अफलातून शतक, ठरला तिसरा युवा फलंदाज

(Sunil Gavaskar got angry on Sanju Samson after  IPL 2021 Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals match Virat Kohli)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.