AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मुंबई इंडियन्स मिळवणार की…! सुनील गावस्कर यांनी घेतलं भलतंच नाव

आयपीएल 2025 स्पर्धेत 51 सामन्यांचा खेळ संपला आहे. मात्र अजूनही प्लेऑफमधील एका संघाचं नाव निश्चित झालेलं नाही. त्याच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आऊट झाले आहेत. तर सनरायझर्स हैदराबादचं शर्यतीतून बाद होणं जवळपास निश्चित आहे. तर जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स, आरसीबी, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चुरस असेल.

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मुंबई इंडियन्स मिळवणार की...! सुनील गावस्कर यांनी घेतलं भलतंच नाव
सुनील गावस्कर आणि मुंबई इंडियन्सImage Credit source: PTI
| Updated on: May 03, 2025 | 5:08 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आहे. सुरुवातीच्या पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं होतं. त्यानंतर सलग सहा सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासठी मुंबई इंडियन्सला तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवणं भाग आहे.पण सध्याची स्थिती पाहता मुंबई इंडियन्सल सहज प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल असं वाटत आहे. इतकंच काय तर सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं मत काही वेगळं आहे. मुंबई इंडियन्स संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या तुलनेत मागे असल्याचं सांगितलं. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक पाच जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची मागच्या चार पर्वात निराशाजनक कामगिरी होती. या पर्वातही सुरुवातीला पदरी निराशाच पडली होती. पण त्यानंतर टीमने चांगलं कमबॅक केलं तसेच एकहाती प्रतिस्पर्धी संघांना पराभवाची धूळ चारत आहेत.

काय म्हणाले सुनील गावस्कर?

मुंबई इंडियन्स आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत पाच जेतेपद मिळवली आहेत. अनेकदा जेतेपद मिळवणार नाही असं वाटत असताना चमत्कार केला आहे. त्यामुळे सध्याचा मुंबई इंडियन्सचा फॉर्म पाहता यंदाच्या जेतेपद त्यांच्याकडेच असेल असं एक्सपर्ट्स आणि फॅन्स सांगत आहेत. पण माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं मत वेगळं आहे. त्यांनी एका मुलाखतीत मुंबई इंडियन्सच्या कामगिरीचं कौतुक केलं. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपेक्षा चांगली नाही असं सांगितलं. यावेळी त्यांनी आरसीबीच्या अष्टपैलू कामगिरीचा दाखला दिला आणि जेतेपदासाठी दावेदार मानलं

सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चांगली बॅटिंग आणि फिल्डिंग करत आहे. मुंबई इंडियन्स त्यांच्या जवळ आहे. पण नुकतीच आघाडी मिळवली आहे.’ मुंबईला विजयाची मालिका पुढच्या तीन सामन्यात कायम ठेवणं आव्हान आहे. कारण शेवटचे तिन्ही सामने बलाढ्य संघांविरुद्ध आहेत. त्यामुळे सुनील गावस्कर यांनी जेतेपदासाठी आरसीबीला पसंती दिली आहे. मागच्या 17 पर्वात आरसीबीची जेतेपदाची झोळी रिती राहीली आहे. मागच्या पर्वात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं पण अंतिम फेरी काही गाठू शकले नाही. यंदा मात्र चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे फॅन्सला संघाकडून फार अपेक्षा आहेत.

सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.