AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅमेऱ्याने सर्व काही टिपलं! आशिष नेहराचा डगआऊटमधून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला सिक्रेट सिग्नल Video

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात कर्णधार शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी चांगली खेळी केली. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी विजय मिळवून दिला. पण डगआऊटमधून आशिष नेहरा सूत्र हलवत होता.

कॅमेऱ्याने सर्व काही टिपलं! आशिष नेहराचा डगआऊटमधून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला सिक्रेट सिग्नल Video
आशिष नेहराImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 03, 2025 | 4:04 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात टायटन्सने प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. नाणेफेकीचा कौल गमवल्याने गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 224 धावा केल्या आणि विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं. कर्णधार शुबमन गिलने 38 चेंडूत 76 धावा, तर जोस बटलरने 37 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनचं अर्धशतक फक्त 2 धावांनी हुकलं. त्याने 23 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तसेच पहिल्या विकेटसाठी शुबमन गिलसोबत 87 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 225 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करून दिली. त्याने 74 धावांची खेळी केली. पण जिथपर्यंत मैदानात होता तिथपर्यंत गुजरात टायटन्सची धाकधूक वाढली होती. पण प्रशिक्षक आशिष नेहरा डगआऊटमधून सूचना देत सूत्र हलवत होता.

आशिष नेहरा डगआऊटमधून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध सिराजला थेट सूचना देत होता. बाउंसर चेंडू टाकण्याचा सूचना देत होता. त्याच्या सूचनांचं पालन केल्याने या दोन्ही गोलंदाजांना फायदा झाला. मोहम्मद सिराजने 4 षटकात 8 निर्धाव चेंडू टाकले. मोहम्मद सिराजने 4 षटकात 33 धावा देत 2 गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केले. दरम्यान, प्रसिद्ध कृष्णा हा पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने 10 सामन्यात 19 गडी बाद केले आहेत. यात 41 धावांवर 4 गडी बाद ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे.

गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून टॉप 4 मध्ये एन्ट्री घेतली आहे. गुजरात टायटन्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने उर्वरित चार पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. तर सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफची काठावरची शक्यता आहे. पण एक पराभव होताच या सर्व आशा मावळणार आहेत. इतकं काय तर पंजाब किंग्सने विजय मिळवला. तर पंजाब किंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट होईल.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.