IPL 2022 Sunil Gavaskar: ‘जबाबदारी घे’, सुनील गावस्करांनी प्रसिद्ध क्रिकेटपटूला फटकारलं

IPL 2022 Sunil Gavaskar: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे एखाद्या विषयावर स्पष्टपणे आपलं मत मांडतात. कॉमेंट्री करताना एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीचं विश्लेषण करताना ते खडेबोलही सुनावतात.

IPL 2022 Sunil Gavaskar: 'जबाबदारी घे', सुनील गावस्करांनी प्रसिद्ध क्रिकेटपटूला फटकारलं
टीम इंडिया-सुनील गावस्करImage Credit source: File photo
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 3:52 PM

मुंबई: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे एखाद्या विषयावर स्पष्टपणे आपलं मत मांडतात. कॉमेंट्री करताना एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीचं विश्लेषण करताना ते खडेबोलही सुनावतात. अजिंक्य रहाणेपासून (Ajinkya Rahane) विराट कोहली (Virat kohli) पर्यंत कोणीही त्यांच्या शब्द बाणांमधून सुटलेला नाही. आता इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन सुरु आहे. गावस्कर नेहमीप्रमाणे समालोचन कक्षात दिसतात. दोन दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना झाला. त्यावेळी सुनील गावस्करांनी एका निर्णयावरुन राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनला सुनावलं. राजस्थान रॉयल्सने त्या दिवशी रविचंद्रन अश्विनला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती दिली. त्यांनी अश्विनला वनडाऊन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. खरंतर त्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन फलंदाजीला येतो. संजू सॅमसन त्या सामन्यात फक्त चार चेंडू खेळला. एनरिख नॉर्खियाने त्याला सहा धावांवर बाद केलं. राजस्थानचा डाव निर्धारित 20 षटकात सहा बाद 160 धावांवर आटोपला.

गावस्करांना निर्णय नाही पटला

हा सामना आठ विकेट आणि 11 चेंडू राखून दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांच्यामध्ये दुसऱ्याविकेटसाठी 144 धावांची भागीदारी झाली. मार्शने 89 तर डेविड वॉर्नरने नाबाद 52 धावा फटकावल्या. या सामन्यात संजू सॅमसनचा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय गावस्करांना पटला नाही.

सुरुवातीपासून मोठे फटके खेळता आले असते

“संजू सॅमसनने या महत्त्वाच्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर येण्याऐवजी चौथ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं होतं. त्याला सुरुवातीपासून मोठे फटके खेळता आले असते” असं गावस्कर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आता बघा काय झालं?

“जर तुम्ही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असाल, तर चौथ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं होतं. इतक्या महत्त्वाच्या मोठ्या सामन्यात जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. आता बघा काय झालं?” असं गावस्कर ऑन एअर कॉमेंट्री करताना म्हणाले. जोस बटलर या सामन्यात स्वस्तात बाद झाला. आर.अश्विनने या सामन्यात आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. पण त्याच्या फलंदाजीत टी 20 सामन्याची गती दिसली नाही. सामन्यानंतर बोलताना संजू सॅमसनने 15 धावा कमी पडल्याचं सांगितलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.