सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु

Suryakumar Yadav And Devisha Blessed With A Baby Girl: आयपीएल 2026 स्पर्धा सुरु असताना क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवला आनंदाची बातमी मिळाली आहे. त्याची पत्नी देविशा शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. सूर्यकुमार यादव आणि देविशा पहिल्यांदा आईवडील झाले आहेत.

सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु
सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा यांच्या घरी 'लक्ष्मी'चे आगमन, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु
Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2026 | 6:02 PM

Suryakumar Yadav And Devisha Blessed With A Baby Girl: भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा शेट्टी आईवडिलांच्या भूमिकेत आले आहे. त्यांच्या घरी छोट्या परीचं आमगन झालं आहे. सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांचं हे पहिलं बाळ आहे. सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी या दोघांनी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 10 वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. याच वर्षी मार्च महिन्यात देविशा शेट्टीचा बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी एक हॉलमध्ये येताना या व्हिडीओत चित्रित केलं होतं. या व्हिडीओनंतर सूर्यकुमार यादवच्या घरी लवकरच लहान बाळ येणार याची कल्पना त्यांच्या चाहत्यांना आली होती. आता या दांपत्याला कन्यारत्न झालं आहे.

सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी एकाच कॉलेजमध्ये होते. या दोघांचं कॉलेजमध्येच एकमेकांवर प्रेम जडलं होतं. एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी 2016 मध्ये लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. देविशा शेट्टीला कॉलेज जीवनात डान्स करणं आवडत होतं. कॉलेजमधील एका डान्स कार्यक्रमात सूर्यकुमार यादवने तिचा परफॉर्मन्स पाहिला. तेव्हापासून तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर या दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली.

आयपीएल 2026 स्पर्धेत सूर्यकुमार यादवची बॅट शांत आहे. त्याने दोन सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. एका सामन्यात पराभव, तर एका सामन्यात विजय झाला. पण सूर्यकुमारचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 10 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुदध् होणार आहे. हा सामना रायपूरमध्ये होणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सूर्यकुमार यादव टीम सोबत रायपूर गेला नाही. त्यामुळे या सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. आयपीएल 2026 मध्ये पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची आशा सूर्यकुमार यादवला असेल. त्याने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 19.50 च्या सरासरीने आणि 145.52 च्या स्ट्राइक रेटने फक्त 195 धावा केल्या आहेत.

Follow Us