AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप 2025 स्पर्धेत रोहित शर्माची आठवण, सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 जाहीर करताना म्हणाला…

आशिया कप स्पर्धेतील औपचारिक सामना भारत आणि ओमान यांच्यात होत आहे. कारण भारताने सुपर 4 मध्ये आधीच एन्ट्री मारली आहे. त्यामुळे या सामन्यात फार काही नाही. पण संघात दोन बदल करण्यात आले आहेत. असं असताना सूर्यकुमार यादवला विसर पडला आणि रोहित शर्माची आठवण झाली.

आशिया कप 2025 स्पर्धेत रोहित शर्माची आठवण, सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 जाहीर करताना म्हणाला...
आशिया कप 2025 स्पर्धेत रोहित शर्माची आठवण, सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 जाहीर करताना म्हणाला...Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Sep 19, 2025 | 7:53 PM
Share

आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. अ गटातून भारत पाकिस्तान आणि ब गटातून श्रीलंका बांग्लादेश हे संघ सुपर 4 फेरीत जागा मिळवण्यास यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे भारत आणि ओमान यांच्यातील सामना औपचारिक आहे. या सामन्यात भारतीय संघाला धार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा फॉर्म तपासता येणार आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने संघात दोन बदल केल्याचं जाहीर केलं. पण अचानक त्याला रोहित शर्माची आठवण झाली. त्याने रोहित शर्माचं प्लेइंग 11 जाहीर करताना एकच हास्यकल्लोळ झाला. कारण सूर्यकुमार यादवला संघातून वगळलेल्या दुसऱ्या खेळाडूचं नाव आठवेना. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं नाव घेतलं.

सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार केला आहे. या स्पर्धेत आम्ही प्रथम फलंदाजी केलेली नाही आणि आम्हाला आमची खोली जाणून घ्यायची आहे. सुपर 4मध्ये खेळण्यासाठी वेळ असणे महत्वाचे आहे. आम्हाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही करत असलेल्या चांगल्या सवयी चालू ठेवायच्या आहेत आणि ते करत राहायचे आहे. ते छान दिसत आहे आणि आमचे सलामीवीर त्याचे पुढे मूल्यांकन करतील. आमच्यात संघात दोन बदल आहेत. हर्षित राणा खेळत आहे. तसेच आणखी एक खेळाडू खेळत आहे. मी रोहितसारखा झालो आहे.’ सूर्यकुमार यादवला दुसऱ्या खेळाडूचं नाव आठवेना तेव्हा त्याने रोहित शर्माचा उल्लेख केला.

सूर्यकुमार यादवला अर्शदीप सिंगचं नाव आठवलं नाही. कारण दुसरा बदल असलेला खेळाडू अर्शदीप सिंग आहे. तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना आराम दिला आहे. तर अर्शदीप सिंग आणि हार्षित राणा यांना संधी दिली आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना